ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी
जनजागृती रॅली

ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी जनजागृती रॅली

Published on

पुणे, ता. ७ : ध्वनी प्रदूषण टाळून आरोग्याची काळजी घेण्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने ‘वॉक फॉर लाउड नॉईज प्रोटेक्शन’ रॅलीचे रविवारी (ता. ७) आयोजन करण्यात आले. टिळक रस्त्यावरील चितळे रुग्णालयापासून रॅलीला प्रारंभ झाला. बाजीराव रस्ता, लक्ष्मी रस्ता मार्गे टिळक चौकापर्यंत रॅली काढण्यात आली.
या रॅलीमध्ये परिमंडळ-एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, डॉ. विनया चितळे यांच्यासह डॉक्टर्स, विद्यार्थी आणि नागरिक सहभागी झाले होते. ‘‘ध्वनिवर्धकाच्या मर्यादेचे उल्लंघन आणि कर्कश आवाज आरोग्यासाठी घातक आहे. याबाबत समाजात जनजागृती करण्याची गरज आहे. समारंभ आणि उत्सवांमध्ये कर्कश आवाजाच्या ध्वनीवर्धकांमुळे बहिरेपणा येतो. नागरिकांनी अशा बाबी टाळून आरोग्याची काळजी घ्यावी,’’ असे आवाहन गिल यांनी केले.
डॉ. चितळे म्हणाल्या, ‘‘हॉर्नचा कर्कश आवाज आणि ध्वनीवर्धकांच्या मोठ्या आवाजामुळे कानातील संवेदनशील पेशींचे नुकसान होते. हे नुकसान पुन्हा भरून काढणे शक्य होत नाही. त्याचा आपल्या दैनंदिन कामकाज आणि आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे सर्वांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे आहे.’’
-----


फोटो- PNE24U30842
PNE24U30841
------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.