शाम भुर्के लेख

शाम भुर्के लेख
Published on

श्याम भुर्के ः एक अवलिया मित्र

लेखक श्याम भुर्के यांना यंदाचा स्नेहांजली पुरस्कार प्राप्त झाला असून त्याचे आज (ता. ५) वितरण आहे. या निमित्ताने त्यांच्या कार्याचा फुलगाव येथील ईश्वरपुरमचे अध्यक्ष विनीत कुबेर यांनी घेतलेला आढावा...

साताऱ्यात कॉलेजला प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थी परिषदेच्या कामातून श्यामचा परिचय झाला. परिचय म्हणायचे की दोस्ती? वयात ४-५ वर्षांचा फरक असूनही पहिल्या भेटीपासूनच आम्ही मित्र बनलो. श्यामची कल्पकता आणि योजकता यातून अनेक कार्यक्रम संस्मरणीय ठरले. ‘बँक ऑफ महाराष्ट्र’मध्ये नोकरी करणारा श्याम आमच्याबरोबर नाटकात काम करत. ‘वाजे पाऊल आपुले’ या नाटकाचा प्रयोग व त्यातली त्याची भूमिका आजही स्मरणात आहे. सातारा शहरात विद्यार्थी परिषदेची मोठी टीम आमच्या काळात उभी राहिली. विद्यार्थी सत्कारापासून श्रमशिबिरापर्यंत आणि कालिदास संगीत स्पर्धेपासून महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेपर्यंत अनेक कार्यक्रम त्या काळात यशस्वी केले गेले.
श्यामचे भाषणकौशल्य सर्वपरिचित आहे. श्यामचे वर्णन विविध गुणांचा एकत्र केलेला पुष्पगुच्छ असेच होऊ शकेल. बँकेवर प्रेम करणारा, नवनियुक्त आणि अनुभवी कर्मचाऱ्यांना बँकेची निष्ठापूर्वक सेवा करण्याची प्रेरणा देणारा प्राचार्य, उत्तम वाचक, मोजकेच परंतु हृदयाला भिडणारे निवेदन करणारा सूत्रसंचालक..! अत्रे, पुलं, जीए अशा लेखकांचे लेखन शब्दातून श्रोत्यांपर्यंत पोहोचविणारा रसिक, आपल्या बुद्धीला चिरतरुण ठेवणारा श्रोता असेच त्याचे वर्णन करावे लागेल.
कोणत्याही कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारायचे नाही असे त्याने ठरविलेलेच असावे. आमच्या ईश्वरपुरम संस्थेत नागालँडचे तत्कालीन राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांची भेट निश्चित झाली. श्याम त्या कार्यक्रमाला उपस्थित होता. पद्मनाभजींना त्याला नागालँडमध्ये भाषणासाठी निमंत्रण दिले. सुदूर नागालँडपर्यंतचा प्रवास करून श्यामने त्या भागातील बँक कर्मचारी आणि इतर मान्यवरांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी लीलया पार पाडली. लायन्स क्लबच्या माध्यमातून अनेक संस्थांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न श्याम सतत करीत असतो. सकाळी उठून योगासने शिकविण्यासाठी बाहेर पडणारा, जग्गनाथ शंकरशेठ यांच्या कामाचा परिचय नव्या पिढीला करून देणारा, वि.स. खांडेकरांच्या स्मरणार्थ भांडारकर इन्स्टिट्यूट ते बी.एम.सी.सी.च्या वळणावरील चौकात पुस्तकांच्या स्वरूपात आयलँड उभारण्यासाठी पाठपुरावा करणारा श्याम सर्वत्र संचार करणारा सक्रिय भाषाप्रभू आहे असेच म्हणावेसे वाटते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com