

पुणे, ता. ३० : ‘‘लोककलावंतांना सराव करण्यासाठी तसेच कार्यक्रम सादर करण्यासाठी हक्काची जागा मिळत नाही. त्यांच्यासाठी महापालिकेने हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी’’, अशी मागणी शाहीर हेमंतराजे मावळे यांनी केली आहे.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे देण्यात येणारा ‘शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कार’ युवा संगीतकार हर्ष विजय यांना प्रदान करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप, संस्कार भारतीचे पश्चिम प्रांत प्रतिनिधी दिलीप क्षीरसागर उपस्थित होते.
जगताप म्हणाले, ‘‘लोककला जिवंत ठेवण्यासाठी पुणे महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करेल. लोककलावंतांना महापालिकेच्या नाट्यगृह किंवा कलादालन यापैकी एक जागा विनामूल्य सादरीकरणासाठी मिळावी, यासाठी महापालिका आयुक्तांकडे चर्चा करण्यात येईल. महापालिका पठ्ठे बापूराव पुरस्कार इतर खासगी संस्थांच्या माध्यमातून पुन्हा सुरू करण्यात येईल.’’ पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर होनराज मावळे यांनी हर्ष विजय यांची मुलाखत घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.