

पुणे, ता. ३० : इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (पॅट) अंतर्गत ‘संकलित चाचणी-एक’ ही परीक्षा २२ ते २५ ऑक्टोबरदरम्यान आयोजित करण्यात येत आहे. या चाचणीअंतर्गत प्रथम भाषा, गणित आणि तृतीय भाषा या विषयांच्या इयत्ता तिसरी ते नववीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा, तसेच खासगी अनुदानित शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची चाचणी होणार आहे.
२०२४-२५ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी एक आणि संकलित मूल्यमापन चाचणी दोन, अशा तीन नियतकालिक चाचण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती संपादणूक पडताळणी आणि त्यामध्ये वाढ करणे, अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणे, राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणमधील संपादणूक वाढविण्याच्या दृष्टिकोनातून मदत करणे, या उद्देशानेही चाचणी घेण्यात येते. ही चाचणी मराठी, उर्दू, इंग्रजी, हिंदी, कन्नड, गुजराती, तमीळ, तेलगू, सिंधी आणि बंगाली अशा दहा माध्यमांत होईल. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयांची इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी चाचण्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
‘संकलित मूल्यमापन चाचणी एक’ ही शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा, तसेच खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आहे. या चाचण्या राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत विद्यार्थीनिहाय पुरविण्यात येणार आहेत. शिक्षणाधिकाऱ्यांकडून प्राप्त सांख्यिकीय माहितीच्या आधारे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात चाचणी पत्रिका वितरित करण्यात येत आहेत. सर्व विद्यार्थ्यांना चाचणी पत्रिका मिळतील, याची जबाबदारी शिक्षणाधिकारी/प्राचार्य (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था-डायट) यांची वैयक्तिकरित्या राहील, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.