

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३० : प्रतिज्ञापत्र, हक्कसोडपत्र तसेच अन्य काही प्रकाराच्या कागदपत्रांसाठी याआधी शंभर ते दोनशे रुपयांचा मुद्रांक लागत होता. आता यात शुल्क वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरीकांना आता पाचशे रुपयांचाच मुद्रांक वापरावा लागणार आहेत.
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात बदल करण्यास राज्य सरकारने आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता दिली. कायद्यात हा बदल झाल्यानंतर अध्यादेश काढून अंमलबजावणी केली जाईल. या निर्णयामुळे आता सर्वसामान्य नागरिकांना जास्त खर्च करावा लागेल.
वर्षभरात अंदाजे आठ ते दहा लाख मुद्रांकांची विक्री होत होती. मुद्रांकाची किंमत आणि प्रत्यक्षात छपाईसाठी होणारा खर्च पाहता ही किंमत कमी असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे म्हणणे होते. त्यामुळे किमतीत वाढ करावी, असा प्रस्ताव यापूर्वीच राज्य सरकारकडे पाठविण्यात आला होता. त्यास अखेर मान्यता मिळाली.
------------
शासकीय कार्यालयांना शुल्कमाफी
विविध प्रकारे दाखले मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयात अर्ज करताना शंभर रुपयांचा मुद्रांक लागतो. २००४ मध्ये राज्य सरकारने त्यास शुल्कमाफी दिली होती. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात बदल करताना ही माफी राज्य सरकारकडून कायम ठेवण्यात आली. त्यामुळे शासकीय कार्यालयातील कामकाजासाठीच शुल्कमाफी कायम राहणार असल्याचे नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.