शिरीष दसनूरकर यांच्या चित्रांचे शुक्रवारपासून प्रदर्शन

शिरीष दसनूरकर यांच्या चित्रांचे शुक्रवारपासून प्रदर्शन

Published on

दसनूरकर यांच्या
चित्रांचे प्रदर्शन
पुणे, ता. ८ ः वास्तुरचनाकार शिरीष दसनूरकर यांच्या निवडक जलरंग व अॅक्रॅलिक चित्रांचे प्रदर्शन येत्या शुक्रवार (ता. १२) ते रविवार (ता. १४) दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवारी सांयकाळी ५ वाजता व्यंगचित्रकार चारुहास पंडित प्रदर्शनाचे उद्‍घाटन करतील. या वेळी दसनूरकर लिखित ‘शिरीषाक्षरे’ या पुस्तकाचे प्रकाशन अभिनेते सचिन खेडेकर यांच्या हस्ते होईल. घोले रस्त्यावरील पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनमधील राजा रविवर्मा कलादालनात सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल.
----
प्रदीप जोशी यांचे
प्रदर्शन बुधवारपासून
पुणे, ता. ८ ः प्रदीप जोशी यांच्या चित्रांचे ‘रंग-गीत’ हे प्रदर्शन बुधवार (ता. १०) ते रविवार (ता. १४) या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी ११ वाजता वास्तू उद्योजक प्रसाद देशपांडे आणि चित्रकार सुचिता तरडे व शरद तरडे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन होणार आहे. हॅपी कॉलनीतील पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांच्या कलादालनात हे प्रदर्शन सकाळी ११ ते सायंकाळी ७ या कालावधीत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असेल.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.