जागा बळकावण्याचा प्रयत्न

जागा बळकावण्याचा प्रयत्न

Published on

पुणे, ता. ९ : वैयक्तिक मालकी असलेल्या शोरूमच्या रिकाम्या जागेला कुलूपबंद गेट लावून जागा बळकावण्याचा प्रयत्न आणि अतिक्रमण केल्याप्रकरणी भारती विहार सोसायटीच्या (श्री गुरुदेवदत्त सहकारी गृहरचना संस्था मर्यादीत) पदाधिकाऱ्यांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका ७५ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भारती विहार सोसायटीमध्ये शोरूम आहे. त्यांनी मिळकत खरेदी करताना सोसायटीकडून एनओसी घेतली होती. ही मिळकत मुळ मालकाने २००० मध्ये बांधकाम व्यावसायिकाकडून गाळ्याच्या साइड मार्जिनसह खरेदी केली होती. या रिकाम्या जागेवर रेस्टॉरंट चालू करायचे असल्याने फिर्यादी यांनी महापालिकेत अर्ज करून सुधारित नकाशास परवानगी घेऊन त्याप्रमाणे तेथे बांधकाम केले होते. तसेच बांधकामाबाहेरील जागा रिकामी ठेवण्यात आली होती. त्यांनी ही जागा भाड्याने दिली होती.

दरम्यान, त्यांच्या भाडेकरूने, सोसायटीचे पदाधिकारी गाळ्याच्या बाजूच्या रिकाम्या जागेच्या वापरास आम्हास मज्जाव करत असून आपल्या मालकीच्या रिकाम्या जागेत सोसायटीच्या पदाधिकारी लोखंडी गेट लावत असल्याचे कळविले. याबाबतची माहिती फिर्यादी यांनी पोलिस नियंत्रण कक्षास दिली. तेव्हा जागेच्या मालकी हक्काबाबत निर्णय होईपर्यंत व बांधकामासंबंधी योग्य ती परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही काम न करण्याच्या तोंडी सूचना पोलिसांनी दिल्या होत्या.

मात्र, दुसऱ्याच दिवशी फिर्यादी यांना गाळ्याच्या बाजूच्या रिकाम्या जागेमध्ये लोखंडी गेट लावून त्याला कुलूप लावल्याचे दिसून आले. त्यामुळे फिर्यादी यांच्या मुलाने सोसायटीचे पदाधिकारी प्रमोद बागल यांना विचारणा केली असता त्यांनी गेट सोसायटीच्या समितीने लावले असल्याचे सांगितले. सोसायटी पदाधिकाऱ्यांकडून रिकाम्या जागेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रयत्न होत असल्याने फिर्यादी यांनी त्यास हरकत घेऊन तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दीपक शेंडे करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.