अवती भवती

अवती भवती

Published on

रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. भारती डोळे
पुणे, ता. ९ : रोटरी क्लब शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी डॉ. भारती डोळे यांची तर सचिवपदी सचिन जोगळेकर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी रोटरीच्या नियोजित प्रांतपाल शीतल शहा, हेमंत पुराणिक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. डोळे यांनी आगामी काळात दिव्यांग संस्थेस साहित्य वाटप, पर्यावरण, महिला सशक्तीकरण, युवक असे विविध प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले.

शालेय साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप
पुणे, ता. ९ : रोटरी क्लब अमनोरा पुणे आणि इंडियन डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये डॉ. गीता मोहन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. वि‌द्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृहांची आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. तसेच विविध प्रकारची पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी पी. व्ही. गुप्ता, सत्येंद्र गुप्ता, मुख्याध्यापिका डॉ. धनश्री मनोरे-काळे, वेंकट रेड्डी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.