रंगभूषाकार सुहास गवते यांचे निधन

रंगभूषाकार सुहास गवते यांचे निधन

Published on

पुणे, ता. ९ : रंगभूषाकार सुहास तानाजी गवते (वय ६०) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. सुहास गवते यांनी रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांच्याकडे रंगभूषेचे प्रशिक्षण घेतले. स्मिता तळवलकर यांच्या ‘अस्मिता चित्र’चे ते प्रमुख रंगभूषाकार होते. ‘तू तिथे मी’, ‘घराबाहेर’, ‘सातच्या आत घरात’, या चित्रपटांसह ‘अवंतिका’, ‘पेशवाई’, नूपुर, ‘छत्रपती शिवाजी’, ‘छत्रपती संभाजी’ या मालिकांसाठी त्यांनी रंगभूषा केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.