भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात जैविक खत प्रकल्प सुरू

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात जैविक खत प्रकल्प सुरू

Published on

पुणे, ता. १० : शहरातील कचऱ्याची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये जैविक खत प्रकल्प केंद्र सुरू करण्याचे आदेश पुणे महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये जैविक खत प्रकल्प केंद्राचे उद्‌घाटन बुधवारी करण्यात आले.
कचऱ्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध प्रकारच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. दरम्यान, जैविक खत प्रकल्प केंद्र क्षेत्रीय कार्यालयानुसार स्थापन करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले होते. पुणे महापालिका व ‘यार्दी’ या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने हे काम केले जाणार आहे. त्यानुसार भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात जैविक खत प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या केंद्राचे उद्‌घाटन उपायुक्त अविनाश सपकाळ, सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी यार्दी वस्ती विकास प्रकल्प स्वच्छता विभागाचे (सीएसआर) व्यवस्थापक मनोज भावसार, अश्‍विनी बोरकर, पल्लवी काळे, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे उपअभियंता वासुदेव कुरबेट, अधिक्षक दत्ता फुले आदी उपस्थित होते. भवानी पेठेतील वस्ती पातळीवरील १५० घरांचा प्रति महिना ९०० ते १२०० किलो ओला कचरा संबंधित केंद्रात येणार आहे. त्याद्वारे खतनिर्मिती केली जाणार आहे. या खताचा वापर वृक्ष लागवडीसाठी केला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.