

पुणे, ता. ३ ः राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुणे महापालिकेतर्फे संपूर्ण शहरात मंगळवारी रात्री विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये संपूर्ण शहरात ३ हजार २७२ विविध संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या मोहिमेमध्ये ७९ टन सुका कचरा, ३९ टन ओला कचरा आणि ३५१ टन राडारोडा गोळा करण्यात आला.
महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात आले. आकाश चिन्ह, अतिक्रमण, उद्यान, पाणीपुरवठा, मलनिःसारण, विद्युत, मोटार वाहन आदी सहभाग यात सहभागी झाले होते. शहरात २३२ ठिकाणी हा कचरा गोळा केला गेला. कात्रज बोगदा ते शनिवार वाडा या मार्गावर स्वच्छता मशाल रॅली काढण्यात आली. या मार्गावर मानवी साखळी करण्यात आली. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते यामध्ये सहभागी झालेल्या प्रतिनिधीचा शनिवारवाडा येथे सत्कार करण्यात आला, अशी माहिती उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.
सफाई सेवकांचा सत्कार
पुणे महापालिकेत उत्कृष्ट काम करणाऱ्या सफाई सेवकांचा सत्कार केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयुक्त राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., संगीतकार सलिल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.