भारतीय संस्कृती परिवर्तनशील ः पांडुरंग बलकवडे

भारतीय संस्कृती परिवर्तनशील ः पांडुरंग बलकवडे

पुणे, ता. ११ ः ‘‘आपल्या संस्कृतीत ज्यावेळी विचारांना, तत्त्वांना ग्लानी आली, त्यावेळी याच संस्कृतीत महान विचारवंत निर्माण होत गेले. या विचारवंतांनी नवा संदेश दिला आणि समाजानेही तो स्वीकारला. प्राचीन भारतीय संस्कृती टिकण्यामागे तिचे परिवर्तनशील असणे, हे मूळ कारण आहे’’, असे मत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.
गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात राज्याच्या माजी अतिरिक्त मुख्य सचिव व ज्येष्ठ लेखिका डॉ. लीना मेहेंदळे लिखित ‘श्रद्धा, अंधश्रद्धा एवं राष्ट्रधर्म’ या पुस्तकाचे प्रकाशन बलकवडे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. याप्रसंगी गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, पुस्तकाचे सहलेखक योगेश्वर कस्तुरे, कार्यक्रमाच्या समन्वयक शुभदा वर्तक आदी उपस्थित होते.
डॉ. मेहेंदळे म्हणाल्या, ‘‘जगभरातील इतर संस्कृती नष्ट झाल्या तरी, आपली प्राचीन भारतीय संस्कृती ही अद्याप टिकली आहे. ही संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीयांनीच प्रयत्नशील रहायला हवे. महाभारत आणि ज्ञानेश्वरी यांचा गाभा ही भगवद्‍गीता आहे. ज्ञानेश्वरी महाराष्ट्रामध्ये नाही तर, भारतभर आणि जगभर जावी, यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत’’.
या वेळी गुरुकुल प्रतिष्ठानच्या वतीने श्रेणिक शहा व लतिका शहा या दांपत्याचा ‘आदर्श माता-पिता पुरस्कार’ प्रदान करत सन्मान करण्यात आला. योगेश्वर कस्तुरे यांनी पुस्तकामागील भूमिका स्पष्ट केली. शुभदा वर्तक यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com