प्रदर्शनातून मिळणार दिव्यांगाना पाठबळ

प्रदर्शनातून मिळणार
दिव्यांगाना पाठबळ
Published on

पुणे, ता. ३ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिव्यांग मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन ‘सिल्करूट एक्झिबिटर्स’तर्फे आयोजित करण्यात आले आहे. शनिवारी आणि रविवारी (ता. ५ व ६) आपटे रस्त्यावरील गो. ल. आपटे सभागृहात सकाळी ११ ते ९ या वेळेत हे प्रदर्शन पार पडेल, अशी माहिती संस्थेच्या डॉ. सुवर्णरेखा देवधर आणि स्नेहल कुलकर्णी यांनी दिली.
प्रदर्शनाच्या उद्‌घाटनाला खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. दिव्यांगांना आर्थिक दृष्टीने सक्षम करणे, त्यांना प्रोत्साहन देणे, असा या प्रदर्शनाचा उद्देश आहे. दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तू, मेणबत्त्या, पणत्या, रांगोळी, सजावटीचे सामान, आकाशकंदील, भेट पाकिटे, भेटकार्ड याशिवाय चॉकलेट्स, फराळाचे पदार्थ, साबण, सौदर्य प्रसाधने अशा हाताने बनविलेल्या वस्तू ४० वेगवेगळ्या स्टॉलमधून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. ‘सिल्करूट एक्झिबिटर्स’मार्फत विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले जाते. त्या प्रत्येक प्रदर्शनात काही स्टॉल दिव्यांग मुलांसाठी आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांसाठी राखीव असतात, असे डॉ. देवधर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com