जीएसबी कोकणी सभेतर्फे शारदोत्सवाचे आयोजन

जीएसबी कोकणी सभेतर्फे शारदोत्सवाचे आयोजन
Published on

पुणे, ता. ३ ः जीएसबी संयुक्त कोकणी सभेतर्फे शारदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक तसेच आरोग्यविषयक उपक्रम राबविले जाणार आहेत. महोत्सवातील सांस्कृतिक उपक्रमांमध्ये प्रसिद्ध कलाकारांसह नवोदित कलाकारांना स्वरमंच उपलब्ध करून दिला जाणार आहे. मंगळवार ते शनिवार (८ ते १२) दरम्यान डी. पी. रस्त्यावर असलेल्या मजेंटा लॉन्स महोत्सव पार पडेल.
महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातमधील परंपरांचा संगम साधत हा शारदोत्सव पार पडेल. शारदोत्सवाचे उद्‍घाटन मंगळवार (ता. ८) सायंकाळी साडेपाच वाजता होणार, अशी माहिती जीएसबी संयुक्त कोकणी सभेचे अध्यक्ष अरुण किणी आणि उपाध्यक्ष जनार्दन भट यांनी गुरुवारी (ता. ३) पत्रकार परिषदेत दिली. सभेचे सचिव मंजुनाथ नायक आणि खजिनदार बिपिन पंडित यावेळी उपस्थित होते. ज्ञान-कला आणि बुद्धीची देवता असलेल्या देवी सरस्वतीची आराधना करण्यासाठी पुण्यात शारदोत्सव सुरू करण्यात येत आहे. या अंतर्गत आयोजित धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम सर्वांसाठी खुले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com