रस्त्यांच्या डांबरीकरणाची वडगाव बुद्रुकमध्ये मागणी

रस्त्यांच्या डांबरीकरणाची
वडगाव बुद्रुकमध्ये मागणी
Published on

पुणे, ता. ३ ः वडगाव बुद्रूकमधील पांऊजाई मंदिर परिसरात दोन रस्ते असून ते कच्चे आहेत. गेल्या २५ वर्षांपासून कच्च्या रस्त्यांमुळे स्थानिकांना मनस्ताप होत आहे. त्यामुळे रस्त्यांचे लवकरात लवकर डांबरीकरण करावे, अशी मागणी विश्वकर्मा प्रतिष्ठानकडून गुरुवारी (ता. ३) पत्रकार परिषदेत करण्यात आली.
प्रतिष्ठानचे विष्णू गरुड यांनी सांगितले की, ‘या रस्त्यावर पथदिवे आहेत. जलवाहिनी, मलनिस्सारण वाहिनीही तयार करण्यात आली आहे. रस्त्यावर प्रचंड खड्डे असून पावसाळ्यात सर्वत्र चिखल होतो. परिसरातील रहिवासी सोसायट्यांसाठी हेच रस्ते आहेत. त्यामुळे आंबेगाव बुद्रूकमधील नागरिकांनाही या रस्त्यांशिवाय पर्याय नाही. या परिसरात मोठ्या प्रमाणात निवासी इमारती बांधण्यास परवानगी देताना रस्त्यांचा विचार तेला जातो, मात्र अधिकृत इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या दुरवस्थेचा फटका बसतो.’ या वेळी दत्ता पाखिरे, शरद कुंभार उपस्थित होते.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com