हौशी ३२ महिलांच्या चित्रांचे आजपासून प्रदर्शन

हौशी ३२ महिलांच्या चित्रांचे आजपासून प्रदर्शन
Published on

पुणे, ता. ३ ः विविध विषयांवरील हौशी ३२ चित्रकार महिलांनी रेखाटलेल्या चित्रांचे प्रदर्शन कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात शुक्रवार (ता. ४), शनिवार (५) आणि रविवारी (ता. ६) आयोजित करण्यात आले आहे. उद्‍घाटन शुक्रवारी (ता. ४) सकाळी ११ वाजता होणार असून त्या प्रसंगी पाहुण्या म्हणून एव्हरेस्ट सर केलेल्या सुविधा कडलग उपस्थित राहणार आहेत.
सकाळी चालण्याचा व्यायाम करणाऱ्यांचा फेसबुकवर ‘वॉक इट आउट, टॉक इट आउट हा ग्रुप आहे. त्यावर राज्यातून २२ हजारांपेक्षा अधिक व्यायामप्रेमी आहेत. या ग्रुपतर्फे या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ दरम्यान सर्वांसाठी खुले आहे. या प्रदर्शनातील चित्रांच्या विक्रीतून जमा होणारा निधी सामाजिक कार्यासाठी वापरण्यात येणार आहे. प्रदर्शनात विविध प्रकारच्या २५० हून अधिक चित्रांचा समावेश असेल. या प्रसंगी मान्यवर चित्रकारांचे थेट प्रात्यक्षिकही (लाइव्ह डेमो) होईल. चित्रकार महिलांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी विविध पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. ‘वॉक इट आउट, टॉक इट आउट ग्रुपच्या संस्थापक नेहा येवले तसेच शिल्पा चुरी, श्रुती सहस्रबुद्धे, रेश्मा बुरसे, जयंत इनामदार, संदीप नहार, सुधीर शिंदे आदींनी प्रदर्शनाचे संयोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com