अवती भवती

अवती भवती
Published on

आरोग्य शिबिरात
४०० रुग्णांची तपासणी
पुणे : माजी नगरसेवक स्व. विश्वनाथ परदेशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात रुग्णांचे डोळे, दंत, हाडांची ठिसुळता आणि रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. हे शिबिर समर्थ युवा फाउंडेशन आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट यांच्या सहकार्याने घेण्यात आले. शिबिरात ४०० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना चष्मे, औषधे मोफत देण्यात आली. शिबिराचे आयोजन डॉ. गणेश परदेशी यांनी केले होते. शिबिर यशस्वितेसाठी डॉ. प्रकाश सहीद्रीकर, डॉ. अजित वहीकर, डॉ. धर्मेंद्र शहा, डॉ. मोहन भोई, सुधीर उटकूर, संजीव नाईक यांनी प्रयत्न केले.
.........
पतसंस्थेच्या सभासदांना
१५ टक्के लाभांश
पुणे : पंडित दीनदयाळ उपाध्याय नागरी सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. या वेळी पतसंस्थेच्या सभासदांना १५ टक्के लाभांश देण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी मिलिंद एकबोटे हे होते. एकबोटे म्हणाले की, संस्थेच्यावतीने गरीब आणि होतकरू महिलांना ‘श्रीगुरुजी स्वयंरोजगार कर्ज योजने’मार्फत कर्जवाटप केले. त्यामुळे त्यांना व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळाले.
....
शिक्षणासाठी १६० मुलींना
पाच लाखांची मदत
पुणे : आचार्य आनंदऋषीजी पुणे ब्लड सेंटर आणि रंगीलदास सुरतवाला ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमात १६० मुलींना शिक्षणासाठी एकूण पाच लाख रुपयांची मदत करण्यात आली. संस्थेचे हे बारावे वर्ष असून, प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार विजय काळे, रमेश बोडके उपस्थित होते. रक्तपेढीचे विश्वस्त अंकुश काकडे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी ब्लड बँकेच्या मुख्य विश्वस्त हीना गुजर, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनीत भावे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सुनील खताळ यांनी केले. पांडुरंग धुमाळ यांनी आभार मानले.
..........
महार रेजिमेंट ८४ वा
स्थापना दिन साजरा
पुणे : फायटिंग प्रथम महार सैनिक यांच्यावतीने प्रथम महार रेजिमेंट ८४ वा स्थापना दिवस वीरमाता-पिता, वीरपत्नी सैनिकांच्या कुटुंबीयांना स्मृतीचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून साजरा केला. तसेच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत पायी लॉग मार्च काढून पुतळ्याला सलामी देऊन अभिवादन करण्यात आले. या वेळी सुरेश चव्हाण, देविदास ओव्हाळ, चंद्रकांत बनसोडे, आकाश कांबळे, विनोद कांबळे, रवी कांबळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालक पोपट आल्हाट यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com