मनाचे श्लोक स्पर्धेचा बक्षिस समारंभ उत्साहात
पुणे, ता. ४ : अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, पुणे केंद्रातर्फे मनाचे श्लोक स्पर्धेचा बक्षिस समारंभ आयोजित केला होता. स्पर्धेत हुजूरपागा शाळेची विद्यार्थिंनी रिद्धी डोईफोडे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. स्व. रामभाऊ म्हाळगी शाळेच्या विद्यार्थी रेवण दळवी द्वितीय आणि भक्ती कापसेने तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ मध्ये विद्यार्थिनी प्रीती जोशी हिचा समावेश आहे. स्पर्धेत चाळीस विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रास्ताविक कार्यवाह विश्वनाथ भालेराव यांनी केले. गिरिजा राऊत, सुजाता मवाळ आणि वासुदेव महाजन यांनी स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहिले. या वेळी मुख्याध्यापक योगेश आवेकर, हुजूरपागा शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती राजमणी, उल्हास पाठक, मुकुंद जोशी, राजेंद्र देवधर, सुवर्णा रिसबूड, पुरुषोत्तम काशीकर आदी उपस्थित होते. शिरीष आठल्ये यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

