अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
Published on

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३ : हिंजवडी आण‍ि मांजरी भागातील अनधिकृत बांधकामांवर वारंवार नोटिसा बजावूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) गुन्हे दाखल केले आहेत.
हिंजवडी येथील स. नं. २५८/१/३ हेक्टर क्षेत्रापैकी काही भागावर सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम करणाऱ्या श्रीकांत भानुदास नवले यांच्याविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात, तर मांजरी येथील सर्व्हे नं. १५३ पैकी काही भागावर अनधिकृत बांधकाम करणाऱ्या दीपाली विजय भाडळे यांच्याविरूद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पीएमआरडीएने पत्राद्वारे कळविले आहे. संबंध‍ित बांधकामधारकांना यापूर्वी वारंवार नोटिसा देऊन अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी कळवले होते. त्याकडे दुर्लक्ष केल्यानंतर प्राधिकरणाने हे गुन्हा दाखल केले आहेत.
प्राधिकरण हद्दीतील मालमत्ताधारकांनी परवानगी घेऊनच बांधकामे करावीत. तसेच सुरू असलेली अनधिकृत बांधकामे तत्काळ थांबवावीत; अन्यथा संबंध‍ितांवर कारवाई करण्याचा इशारा प्राधिकरणाच्या अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील यांनी दिला आहे.

पहिल्यांदाच नोंदवला या कलमान्वये गुन्हा
हिंजवडी व मांजरी येथील अनधिकृत बांधकाम करणाऱ्या दोघांवर पहिल्यांदाच ‘महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियममधील कलम ५४’नुसार कारवाई करण्यात आली आहे. नोटीस दिल्यानंतरही बांधकाम न थांबविल्यास तीन वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा पाच हजार रुपये दंड किंवा दोन्ही, अशा शिक्षेची तरतूद या कलमामध्ये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com