फॅमिली इंटेरियरतर्फे डिझाईन प्रदर्शन
पुणे, ता. ४ ः जागतिक आर्किटेक्चर दिनानिमित्त फॅमिली इंटेरियरतर्फे डिझाईन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार ते रविवार (ता. ४ ते ६) दरम्यान राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्समध्ये हे प्रदर्शन होईल.
प्रदर्शनाचे यंदा चौथे वर्ष असून ते सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे. या प्रदर्शनात विविध नामांकित कंपन्यांचे ९० स्टॉल लावण्यात येतील, अशी माहिती आयोजक व फॅमिली इंटेरियरचे मितेश पतंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ‘आर्चक्रांती’चे प्रवीण माळी, माधुरी माहेश्वरी, वास्तुरचनाकार शीतल चौधरी, वैभवी अग्रवाल, आर्टिस्ट संतोष नंदरकर आणि हुनर गुरुकुलचे अनिरुद्ध बनसोड उपस्थित होते.
यंदाच्या वर्षीचे वेगळेपण सांगताना प्रवीण माळी म्हणाले, प्रदर्शनाच्या ठिकाणीच ‘आर्चक्रांती’ने दोन दिवसांची कार्यशाळा ठेवली आहे. यामध्ये आम्ही तयार केलेली वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन देखील प्रदर्शित करण्यात येतील.
-----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

