मार्केट यार्ड परिसरात तरुणाची हत्या

मार्केट यार्ड परिसरात 
तरुणाची हत्या
Published on

पुणे, ता. ३ : एका सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते बाळासाहेब रणदिवे (वय २८, रा. आंबेडकरनगर) यांच्यावर हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून खून केला. ही घटना बुधवारी (ता. २) मार्केट यार्ड परिसरात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.
राहुल दत्तात्रय खुडे (वय ४०, रा. गुलटेकडी), सचिन दत्तात्रय खुडे (वय ३८, रा. गुलटेकडी), सूरजसिंग दिलीपसिंग दुधानी (वय २७, रा. गुलटेकडी) आणि हनुमंत लकप्पा कांबळे (वय ३०, रा. येवलेवाडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध मार्केट यार्ड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणदिवे मार्केट यार्ड परिसरातील एका हॉटेलमध्ये मित्रासमवेत चहा पीत होते. तेथे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चौघेजण आले. रणदिवे यांनी व्हॉटसॲपवर पाठविलेल्या एका संदेशावरून चिडून त्या चौघांनी रणदिवे यांच्यावर कोयत्याने वार केले. या हल्ल्यात रणदिवे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) राहुल खिलारे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com