अत्याचाराच्या घटनेचा विविध पक्षांकडून निषेध

अत्याचाराच्या घटनेचा 
विविध पक्षांकडून निषेध
Published on

पुणे, ता. ३ : बदलापूर येथे शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतरही राज्य सरकारने विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी कोणतीही धोरणात्मक भूमिका स्पष्ट केली नाही. कोंढव्यातील दोन चिमुकल्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची बाब उघडकीस आली. या घटनेचा विविध पक्षांकडून तीव्र निषेध करण्यात आला.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अशी घटना उघडकीस येणे, ही अत्यंत शरमेची बाब असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. या प्रकरणातील दोषींवर जास्तीतजास्त कलमे लावावीत आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी जगताप यांनी केली.
‘‘संबंधित शाळेतील स्कूल बसचालकाचा पगार, ग्रॅच्युइटी, पीएफ तातडीने थांबविण्याची कार्यवाही करावी. तसेच, संबंधित शिक्षण संस्थेवरही गुन्हा दाखल व्हावा,’’ अशी मागणीही या वेळी करण्यात आली.
‘‘शाळेचे संस्थाचालक आणि मुख्याध्यापक यांच्यावरदेखील गुन्हा दाखल करण्यात यावा. प्रत्येक शालेय वाहनामध्ये महिला मदतनीस नेमण्यात यावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे, जीपीएस यंत्रणा असावी, प्रत्येक विद्यार्थ्याच्या संरक्षणाची जबाबदारी शाळा प्रशासनाची आहे. या सर्व सुविधा केल्याशिवाय स्कूल बस सुरू करण्यात येऊ नये, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहराध्यक्ष संजय मोरे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com