डॉ. आंबेडकर वसतिगृहाची अखेर होणार देखभाल-दुरुस्ती
पुणे, ता. ४ : घोले रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये ६३ लाख रुपयांच्या निविदेला मान्यता दिली आहे. दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर अखेर प्रशासनाला या प्रश्नाकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला आहे.
ऑगस्ट महिन्यात आंबेडकर वसतिगृहातील दोन विद्यार्थ्यांचा डेंगीमुळे मृत्यू झाला होता. हा गंभीर प्रकार ‘सकाळ’ने उघडकीस आणल्यानंतर विद्यार्थी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यामुळे महापालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी वसतिगृहाची पाहणी केली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनीही वसतिगृहाला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. दरम्यान, महापालिका प्रशासनाने किरकोळ सोई-सुविधा देऊन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली होती. त्यानंतरही डेंगीचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळले होते.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने संबंधित वसतिगृहाच्या देखभाल-दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. पालिकेच्या स्थायी समितीमध्ये वसतिगृहाच्या स्थापत्यविषयक देखभाल-दुरुस्तीसाठी ६३ लाख ९८ हजार रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्याबाबतच्या निविदेस मंजुरी दिली आहे. संबंधित निधीतून स्वच्छतागृहे, जलवाहिनी, मलवाहिनी, दरवाजे, खिडक्या, गळती, फरशी या स्वरूपाची कामे केली जाणार आहेत. या वसतिगृहामध्ये अकरावी ते पदवीपर्यंतचे विद्यार्थी आहेत. वसतिगृहामध्ये १०८ खोल्या असून ४०० विद्यार्थ्यांची क्षमता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

