‘गीतों का सफर’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे, ता. ४ ः महेश प्रोफेशनल फोरम प्रेशियस डायमंड्स व गोल्डन एरा या माहेश्वरी समाजातील ज्येष्ठ नागरिकांच्या ग्रुपद्वारे आयोजित गायक जितेंद्र भुरुक यांचा ‘गीतों का सफर’ या आर्केस्ट्राने रसिकांचे नुकतेच दिलखुलास मनोरंजन केले.
या कार्यक्रमाच्या खर्चातून उरलेली रक्कम गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी खर्च करण्यात येईल, अशी घोषणा दोन्ही ग्रुपचे अनुक्रमे अध्यक्ष पुष्पा तोष्णीवाल व गणेश भट्टड यांनी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही ग्रुपचे प्रकल्प प्रमुख सत्यनारायण मुंदडा व ममता तापडिया यांनी कार्यकर्त्यांसह प्रयत्न केले. या कार्यक्रमासाठी राजीव गांधी ॲकॅडमीचे सभागृह उपलब्ध करून दिले. माजी उपमहापौर आबा बागूल यांचे आभार मानण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

