रोजगारक्षम होण्यासाठी ज्ञान-कौशल्य आवश्यक
पुणे, ता. ४ : ‘‘युवकांना कौशल्यावर आधारित शिक्षण देण्याची गरज आहे. रोजगारक्षम होण्यासाठी तंत्र शिक्षणाबरोबरच उद्योगांच्या गरजांप्रमाणे ज्ञान आणि कौशल्य आवश्यक आहे,’’ असे मत अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे अध्यक्ष डॉ. टी. जी. सीताराम यांनी व्यक्त केले.
किवळे येथील सिंबायोसिस स्किल्स ॲण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा पाचवा पदवी प्रदान सोहळा नुकताच झाला. या वेळी ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार, कुलगुरू राजेश इंगळे आदी उपस्थित होते. फिरोदिया म्हणाले, ‘‘देशाला अशा अनेक कौशल्य विद्यापीठांची गरज आहे. अद्ययावत कॅम्पस आणि झपाट्याने वाढत असलेल्या उद्योग क्षेत्रांसाठी प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याकरिता आधुनिक प्रयोगशाळा विद्यापीठांमध्ये असणे आवश्यक आहे.’’
डॉ. मुजुमदार म्हणाले, ‘‘कौशल्यावर आधारित शिक्षण हे भारताच्या शिक्षणाचे भविष्य आहे. कौशल्याअभावी रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाहीत. आपल्या तरुणांना रोजगार मिळावा, या उद्देशाने सिंबायोसिस स्किल्स ॲण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (पुणे) आणि सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस (इंदूर) ही दोन कौशल्य विद्यापीठे सुरू केली आहेत.’’ डॉ. स्वाती मुजुमदार यांनी प्रास्ताविक केले. राजेश इंगळे यांनी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

