

पुणे, ता. ४ : देशाच्या ग्रामीण भागातील युवकांमध्ये वाचनाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘ज्ञान की लायब्ररी’ , ‘अरहम फाउंडेशन आणि ‘बुक्स फॉर रूरल एरियाज ऑफ व्हिएतनाम’ यांच्यातर्फे ‘बुक्स फॉर रूरल इंडिया’ या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे ते मुंबई अशा पदयात्रेचे तळेगाव दाभाडेवरून उद्या (ता. ५) प्रस्थान होणार आहे.
देशाच्या ग्रामीण भागात ८० लाख ग्रंथालये उभारण्याचे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. संवेदनशील युवक घडविण्यासाठी मूळचे व्हिएतनामचे असणारे युनेस्को पुरस्कार विजेते गुयेन क्वांग थाच हे देशातील २९ राज्यांमधून सुमारे ३००० किलोमीटर अंतराची पदयात्रा काढणार आहेत. महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या थाच यांनी व्हिएतनाममध्ये ‘बुक्स फॉर रूरल एरियाज ऑफ व्हिएतनाम’ हा उपक्रम राबवला. या उपक्रमाद्वारे जी वाचन क्रांती त्यांनी व्हिएतनाममध्ये घडवून आणली त्याची संपूर्ण जगाने दखल घेतली. भारतामध्ये देखील थाच यांना अशीच क्रांती अभिप्रेत आहे. ही पदयात्रा मुंबईत १६ ऑक्टोबर रोजी चर्चगेट मधील महात्मा गांधी पुतळा येथे दाखल होईल.
-------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.