

वडगाव शेरी, ता. ४ : नगर रस्ता परिसरात विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये महिला सहाय्यक नसलेल्या दहा वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) भरारी पथकाने कारवाई केली. बाललैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्यानंतर शालेय बसची तपासणी सुरू करण्यात आली आहे.
वानवडी येथे स्कूल बसमध्ये दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार नुकताच समोर आला. राज्य सरकारने शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी लागू केलेल्या नियमावलीचे बऱ्याच ठिकाणी उल्लंघन होत आहे. मात्र, आता जागे झालेल्या प्रादेशिक परिवहन विभागाने नगर रस्त्यावर विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या ४५ वाहनांची तपासणी केली. त्यातील दहा वाहनांमध्ये महिला सहाय्यक नसल्याचे दिसून आले. काही वाहनांमध्ये नियमापेक्षा जास्त विद्यार्थी कोंबण्यात आले होते. नगर रस्त्यावर शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी सकाळी सहा वाजता सुरू झाली. भरारी पथकाच्या दोन मोटार वाहन निरीक्षक आणि दोन सहाय्यक निरीक्षकांनी या कारवाईत भाग घेतला, अशी माहिती भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी दिली.
वाहतूक नियमांचे पालन स्कूल बसचालक करतात का, हे शाळेसह प्रत्येक पालकांनीही पाहावे. नियमाची काटेकोर अंमलबजावणी झाली, तरच सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीचे उद्दिष्ट पूर्ण होईल. परंतु, दुर्दैवाने बऱ्याच ठिकाणी नियमाचे उल्लंघन होत आहे.
पौर्णिमा गादिया, समाजसेविका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.