

पुणे, ता. ४ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरुध्द दाखल फौजदारी तक्रारीची सुनावणी गुरुवारी (ता. १०) विशेष न्यायालयात होणार आहे.
गांधी यांनी लंडनमध्ये काही महिन्यांपूर्वी अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यावर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी गांधी यांच्याविरोधात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. या संदर्भात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी गांधी यांना न्यायालयात हजर राहून आपले म्हणणे मांडण्याचा आदेश दिला होता.
या प्रकरणाची पुढील सुनावणी चार ऑक्टोबरला होणार होती. परंतु या प्रकरणात गांधी यांना समन्स प्राप्त झालेला नाही. समन्स मिळाल्याचा अहवाल न्यायालयात सादर केल्याशिवाय पुढील सुनावणी होणार नाही, असा युक्तिवाद ॲड. असीम सरोदे यांनी केला. त्यावर विशेष न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.