

पुणे, ता. ४ : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात शनिवारी (ता. ५) आणि रविवारी (ता. ६) तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून, ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर विदर्भात रविवारी येलो अलर्ट आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली.
नैऋत्य मॉन्सून पश्चिम उत्तर प्रदेशच्या उर्वरित भागात, मध्य प्रदेशच्या आणखी काही भागात, पूर्व राजस्थानच्या उर्वरित भागात, गुजरातच्या आणखी काही भागासह महाराष्ट्राच्या काही भागातून पुढील दोन-तीन दिवसांत परतण्यास अनुकूल परिस्थिती आहे. राज्यात अनेक ठिकाणी पहाटेच्यावेळी धुके, दिवसभर उन्हाचा चटका आणि काहीवेळ ढगाळ वातावरण अशी स्थिती नागरिक अनुभवत आहेत. मराठवाड्यात शुक्रवारी तुरळक ठिकाणी जोरदार, तर कोकण-गोव्यासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला.
पुणे आणि आसपासच्या परिसरात शनिवारी आणि रविवारी आकाश अंशतः ढगाळ राहील. दुपारी आणि संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहून मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. सोमवारी (ता. ७) आणि मंगळवारी (ता. ८) आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. या काळात कमाल तापमानाचा पारा ३२ ते ३३ अंश सेल्सिअस दरम्यान राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.