नुसते फुकट पैसे महिला घेणार नाही

नुसते फुकट पैसे 
महिला घेणार नाही
Published on

पुणे, ता. ४ : ‘‘महिलांना केवळ शक्ती देऊन चालणार नाही, तर त्यांना सन्मानही दिला पाहिजे. नुसते फुकट पैसे महिला घेणारच नाहीत. त्यांना कमीतकमी व्याजदराने किंवा शून्य व्याजाने कर्ज दिल्यास महिला सक्षमपणे उभ्या राहतील,’’ असे मत विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी (ता. ४) व्यक्त केले. ‘लाडकी बहीण’ योजनेच्या पार्श्‍वभूमीवर मुंडे यांनी सूचक वक्तव्य केल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.
रमाबाई आंबेडकर महिला सबलीकरण केंद्रातर्फे आयोजित ‘धागा’ या स्वदेशी मेळ्याचे उद्‍घाटन मुंडे यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनाच्या संयोजक व खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, द शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष चारुदत्त देशपांडे, ब्रिहन्स नॅचरल प्रॉडक्टसच्या संचालक शीतल आगाशे, एमएसएमईचे सहसंचालक मिलिंद बारापात्रे, उपसंचालक अभय दफ्तरदार, माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, जयंत भावे आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. मेधा कुलकर्णी यांचे भाषण झाले. सूत्रसंचालन प्रिया निघोजकर यांनी केले.
जागावाटप निश्चित नाही...
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना मुंडे म्हणाल्या,‘‘ अपेक्षेप्रमाणे जागावाटप झाले नाही, तर अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील, ही चर्चा केवळ माध्यमांमध्येच आहे. माझ्या ऐकिवात असे काही आलेले नाही. जागावाटप अजून निश्चित झालेले नाही. अजित पवार यांच्याबाबतची चर्चा माध्यमांमध्येच होत आहे.’’ मराठीला अभिजात दर्जा मिळाल्याचा मला प्रचंड आनंद आणि अभिमान आहे. असेही त्यांनी सांगितले. तर ‘‘पुण्यातील महिला अत्याचाराच्या घटना अत्यंत घृणास्पद आहेत. कायद्याचा वचक असला पाहिजे. कडक कायदे असले पाहिजेत, असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com