वाहन खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

वाहन खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी

Published on

पुणे, ता. ५ : नवरात्रोत्सव आणि दसऱ्याचे औचित्य साधून ग्राहकांना वाहनांची खरेदी अधिक सोप्या पद्धतीने करता यावी, यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या ‘ऑटो एक्स्पो’चे राज्य सहकारी बँकेचे प्रशासक व विद्या सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते शनिवारी दिमाखात उद्‍घाटन झाले. रविवारी (ता. ६) एक्स्पोचा शेवटचा दिवस आहे.
या एक्स्पोमध्ये वाहनांचे विविध प्रकार उपलब्ध असून ग्राहकांना एकाच छताखाली सर्व माहिती मिळणार आहे. उद्‍घाटनप्रसंगी विद्या सहकारी बँकेचे उपाध्यक्ष नितीन किवळकर, नमः शिवाय हिरोचे संचालक शिवम उणेचा व हरीओम उणेचा, अरिहान सुझुकीचे सेल्स हेड मिलिंद बिरारी, बी. यू. भंडारी ग्रुपच्या सेल्स व मार्केटिंग विभागाच्या उपाध्यक्ष वैजयंती शेवडे, तुणवाल ई-मोटर्सच्या सेल्स हेड तेजस्विनी मोघे आदी उपस्थित होते.
सर्वसाधारणपणे ग्राहकांना वाहन खरेदी करताना विविध पर्यायांबद्दल अनेक प्रश्न पडतात. कोणते वाहन घ्यावे, त्यात कोणती वैशिष्ट्ये आहेत, यासाठी वेगवेगळ्या शोरूमला भेट देणे आणि वेळेचा व पैशांचा खर्च करणे आवश्यक ठरते. मात्र, या एक्स्पोमध्ये एकाच छताखाली विविध कंपन्यांची पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक कार्स तसेच दुचाकींचे ब्रँड्स उपलब्ध आहेत. ग्राहकांना येथे मोठ्या सवलतींचाही लाभ घेता येणार आहे, ज्यामुळे वाहन खरेदी अधिक सोपी होईल. या एक्सपोमध्ये ‘विद्या सहकारी बँक लिमिटेड’ हे बँकिंग पार्टनर म्हणून सहभागी आहेत.


‘न्यू लॉंच’
‘सकाळ ऑटो एक्स्पो’च्या निमित्ताने न्यू एपिक स्विफ्ट एस सीएनजी १.२, न्यू व्हर्चुअस जीटी लाईन १.०, टायगुन हाय लाईन प्लस १.०, न्यू मॅग्नाईट टेक्ना प्लस सीव्हीटी १.० या मोटारींचे अनावरण करण्यात आले. डिझाईन, इंजिन कार्यक्षमता आणि पर्यावरणपूरक ही या वाहनांची वैशिष्ट्ये आहेत.

‘सकाळ माध्यम समूह’ आणि सामाजिक कार्य यांचे अनोखे नातं आहे. ‘सकाळ’च्या प्रत्येक उपक्रमाला होणाऱ्या गर्दीमागे लोकांचा ‘सकाळ’वर असणारा विश्वास आहे. त्यामुळे या ठिकाणी सहभागी होणाऱ्या सर्व व्यावसायिकांना तसेच ग्राहकांना या एक्स्पोचा फायदा होतो.
- विद्याधर अनास्कर,
प्रशासक, राज्य सहकारी बँक व अध्यक्ष, विद्या सहकारी बँक

ऑटो एक्स्पो आणि आमचं खूप जुनं नातं आहे. या एक्स्पोमध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर असतो. येथे येणाऱ्या ग्राहकाला वेगवेगळे पर्याय पाहायला मिळत असल्यामुळे कोणते वाहन घ्यायचे, याचा निर्णय घेणे सोपे जाते. असे उपक्रम नेहमीच राबवले जावेत अशी अपेक्षा आहे.
- वैजयंती शेवडे,
उपाध्यक्ष (सेल्स व मार्केटिंग), बीयू भंडारी

या एक्स्पोमध्ये मनासारखे पर्याय पाहायला मिळाले. कारण येथे वेगवेगळ्या प्रकारची वाहने आहेत. त्यामुळे निर्णय लगेच घेता आला.
- मयूर गुंडाळे, ग्राहक

हे लक्षात ठेवा
- कुठे : पंडित फार्म्स, डीपी रस्ता, कर्वेनगर
- कधी : रविवारी (ता. ६)
- केव्हा : सकाळी १० ते रात्री ८
- सुविधा : प्रवेश व पार्किंग मोफत
- संपर्क : ९३२५१०६६२६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com