विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्तीची घोषणा
पुणे, ता. ५ : दिवंगत आमदार विनायक निम्हण यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनतर्फे पालकांची आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांना विनायक निम्हण गौरव शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. शहरातील विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार असून याची नोंदणी ‘सनी विनायक निम्हण’ या संकेतस्थळावर १५ ऑक्टोबरपर्यंत सुरू असल्याची माहिती फाउंडेशनचे सनी निम्हण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बिपिन मोदी, उमेश वाघ, अमित मुरकुटे, अनिकेत कपोते उपस्थित होते.
संकेतस्थळावर नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची १८ ते २० ऑक्टोबर या कालावधीत फाउंडेशनच्या शिवाजीनगर येथील गोपीभवन जवळील कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना २६ ऑक्टोबरला बालगंधर्व रंगमंदिर येथे शिष्यवृत्तीचे वाटप केले जाईल. विविध अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी आर्थिक निकष, नियम व अटीची पुर्तता करून गौरव शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
निम्हण म्हणाले, पाचवी व आठवीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेस बसलेल्या आणि काहीच गुण कमी पडल्यामुळे शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उमेद न सोडता प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक व्हावे यासाठी प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यात येते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

