नागरिकांची कायमच 
सैनिकांप्रती कृतज्ञ भावना

नागरिकांची कायमच सैनिकांप्रती कृतज्ञ भावना

Published on

पुणे, ता. ९ : ‘‘देशातील नागरिक कायमच सैनिकांप्रती कृतज्ञ भावना ठेवतात. हेच सैनिक देशासाठी लढताना अपंगत्व आले, तरी जिद्द सोडत नाहीत. आत्मविश्वासाने ते आलेल्या परिस्थितीला सामोरे जातात,’’ असे मत एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी व्यक्त केले.
समर्थ प्रतिष्ठान ढोल-ताशा, ध्वज आणि ढाल-तलवार पथक हे २५ वा वर्धापनदिन सोहळा साजरा करत आहेत. त्यानिमित्त ‘समर्थ गौरव पुरस्कार’ प्रदान सोहळ्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे केले होते. क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटला यंदाचा समर्थ गौरव पुरस्कार गोखले यांच्या हस्ते प्रदान झाला. यावेळी इन्स्टिट्यूटचे डीन कर्नल (निवृत्त) वसंत बल्लेवार आणि कर्नल (निवृत्त) चंद्रशेखर चितळे यांनी पुरस्कार स्वीकारला. त्यानंतर समर्थ प्रतिष्ठानच्या स्मरणिकेचे प्रकाशन झाले. यावेळी किरण साळी, हनुमंत बहिरट, अ‍ॅड. प्रताप परदेशी, डॉ. मिलिंद भोई, डॉ. अ. ल. देशमुख, प्रसाद कुलकर्णी, प्रशांत टिकार, विकास पवार, पराग ठाकूर उपस्थित होते. फाउंडेशनतर्फे हिरामण बनकर विद्यालय, पुणे विद्यार्थी गृह यांना क्रीडा साहित्य खरेदीसाठी प्रत्येकी २५ हजार आणि वृद्धेश्वर-सिद्धेश्वर मंदिर जीर्णोद्धारासाठी एक लाख २५ हजार रुपये देण्यात आले. यावेळी २५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्वही घेण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च केला जाणार आहे. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. अथर्व कुलकर्णी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com