जन्म- मृत्यू नोंदणीची प्रक्रिया ठप्प

जन्म- मृत्यू नोंदणीची प्रक्रिया ठप्प

Published on

पुणे, ता. ९ : जन्म-मृत्यू नोंदणी व दाखले देण्यासाठी वापरली जाणार ऑनलाइन प्रणाली ठप्प झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. ही प्रणाली केंद्र सरकारकडून महापालिकेला देण्यात आली आहे. त्यातील तांत्रिक अडचणींबाबत लेखी तक्रार केली आहे; पण सुधारणा होत नसल्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
शहरातील २०१९ पासून केंद्र सरकारच्या नागरी नोंदणी सॉफ्टवेअरमध्ये (सीआरएस) जन्म व मृत्यूची नोंद होते. त्यापूर्वी महापालिकेची प्रणाली होती, पण देशभर सर्वत्र एकसारखेच जन्म व मृत्यू दाखले दिले जावेत, यासाठी केंद्राने एक प्रणाली तयार केली. याच प्रणालीचा वापर करणे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक आहे. काही महिन्यांपूर्वी या प्रणालीमध्ये बदल केले आहेत. शहरात कोणत्याही भागात जन्म अथवा मृत्यू झाल्यास नागरिकांना महापालिकेच्या कोणत्याही क्षेत्रीय कार्यालयातून जन्म-मृत्यूचे दाखल मिळत होते. पण २४ जूनपासून या सॉफ्टवेअरमध्ये बदल केले आहेत. त्यामध्ये ज्या क्षेत्रीय कार्यालयात जन्म किंवा मृत्यूची नोंद झाली, तेथेच त्यांना दाखला मिळत आहे. याचा फटका अनेकांना बसत असून, क्षेत्रीय कार्यालयांमध्ये खेटे मारावे लागत आहेत. त्यातच ही प्रणाली बंद होत आहे किंवा त्याचे कामकाज मंदावत आहे. त्यामुळे दाखले घेण्यासाठी नागरी सुविधा केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागत आहेत.
यासंदर्भात दोन आठवड्यापूर्वी झालेल्या बैठकीत पुणे महापालिकेसह जिल्ह्यातील डॉक्टरांनी व कर्मचाऱ्यांनी राज्य शासनाकडे तक्रारींचा पाढा वाचला; पण त्यात सुधारणा झालेली नाही. आजही पुणे महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रातील यंत्रणा ठप्प झाली होती. त्याबाबत राज्य सरकारला पत्र पाठवून तक्रार केली जाणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com