‘वाणिज्य विद्यार्थ्यांना
विमा क्षेत्रात अनेक संधी’

‘वाणिज्य विद्यार्थ्यांना विमा क्षेत्रात अनेक संधी’

Published on

पुणे, ता. ९ : ‘‘देशातील संपूर्ण लोकसंख्येचा विमा २०४७ पर्यंत उतरविण्याचे ध्येय भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने निश्चित केले आहे. त्यामुळे विमा व्यवसायाची वाढ होऊन रोजगार आणि व्यवसायाच्या अगणित संधी उपलब्ध होणार आहेत,’’ असे प्रतिपादन नॅशनल इन्शुरन्स ॲकॅडमीचे प्राचार्य डॉ. संजय माळी यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डी. एस. सावकार अध्यासन आणि वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विमा व्यवसायातील संधी’ या विषयावर डॉ. माळी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. याप्रसंगी डी. एस. सावकार अध्यासन प्रमुख डॉ. अशोक कांबळे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. जी. श्यामला, विखे पाटील अध्यासन प्रमुख डॉ. अनिल करंजकर आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. माळी म्हणाले, ‘‘विमा व्यवसायात विमा संसाधन व्यवस्थापक, जाहिरात, विमा दाव्यांची पूर्तता, विमा संख्याशास्त्रज्ञ, सेवा व्यवस्थापक, सायबर विमा, विक्री व विपणन अशा अनेक क्षेत्रांत संधी उपलब्ध होणार आहेत.’’ डॉ. कांबळे यांनी प्रास्ताविक केले, तर नेहा जाधव यांनी आभार मानले.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com