तोतया डॉक्टरचा वारज्यात पर्दाफाश
पुणे, ता. ९ : बनावट वैद्यकीय पदवीच्या आधारे गेल्या २२ वर्षांपासून वारजे परिसरात दवाखाना चालविणाऱ्या तोतया डॉक्टरचे पितळ अखेर उघडे पडले. वारजे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला. बिभुती विमल बागची (वय ४३, रा. गोकुळनगर, वारजे) असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी महापालिकेतील वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा तरडे (वय ४५) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून बागची याच्याविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. बागची वारजेमधील सय्यदनगर परिसरात मागील २००२ पासून मूळव्याध उपचार केंद्र चालवत होता. त्याने ‘बीईएमएस’ वैद्यकीय पदवी घेतल्याचे भासवले. तसेच ‘महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन’कडून व्यवसायास मान्यता नसताना त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी केली. त्याने मूळव्याध उपचार केंद्र सुरू करून अनेक रुग्णांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाला माहिती मिळाल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

