समाजकल्याण विभागातील ३७ अधिकाऱ्यांच्या बदल्या
पुणे, ता. ९ : समाजकल्याण आयुक्तालयांतर्गत असलेल्या ३७ अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या आहेत. यामध्ये पुण्यामधील समाजकल्याण विभागातील पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
समाजकल्याणच्या प्रादेशिक उपायुक्तपदी बाळासाहेब सोळंकी यांच्या जागेवर वंदना कोचुरे यांची नियुक्ती केली आहे तर समाजकल्याण उपायुक्तपदी स्वाती इथापे, उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या सदस्यपदी संजय दाणे, जिल्हा समाजकल्याण अधिकारीपदी राधाकिसन देवढे आणि राज्य मागासवर्ग आयोगाच्या संशोधन अधिकारीपदी आर. के. भोसले यांची नियुक्ती केली आहे. राज्यातील १२ समाजकल्याण उपायुक्तांच्या प्रशासकीय तर तिघांची विनंती बदली केली आहे. १५ सहाय्यक आयुक्तांच्या प्रशासकीय तर तीन जणांची विनंती बदली केली असून, चार समाजकल्याण अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाचे अवर सचिव सतीश खैरमोडे यांनी बदल्यांचा आदेश जारी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

