‘म्हाडा’च्या सदनिकांसाठी 
आजपासून करा अर्ज

‘म्हाडा’च्या सदनिकांसाठी आजपासून करा अर्ज

Published on

पुणे, ता. ९ : दसऱ्यानिमित्त ‘म्हाडा’च्या पुणे विभागाने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह पीएमआरडीए हद्द, सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सहा हजार २९४ सदनिकांची सोडत जाहीर केली आहे. या सोडतीसाठी नागरिकांना गुरुवारी (ता. १०) दुपारपासून म्हाडाच्या संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.
म्हाडा गृहनिर्माण योजनेत ‘प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य’मध्ये दोन हजार ३४०, म्हाडाच्या विविध योजनांतील उपलब्ध सदनिका ९३, प्रधानमंत्री आवास योजनेत ‘प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य’मध्ये ४१८ सदनिका सोडतीसाठी उपलब्ध आहेत तर २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत तीन हजार ३१२ सदनिका, तर १५ टक्के सामाजिक गृहयोजनेतील १३१ सदनिकांसाठी सोडत होणार आहे, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com