

नैतिकता आणि उद्यमशीलता यांचा अपूर्व आणि आदर्श संगम रतनजी टाटा यांच्या ठायी होता. सुमारे १५० वर्षांची श्रेष्ठत्व आणि सचोटीची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलणारे रतनजी टाटा हे एक जिवंत आख्यायिका होते. त्यांनी वेळोवेळी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कणखरपणा टाटा समूहाला वेगळ्या औद्योगिक उंचीवर घेऊन गेला. त्यांना मी आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो. रतनजी टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
महान उद्योजक आणि तेवढेच थोर समाजसेवी रतन टाटा यांच्या जाण्याने मला अतीव दुःख झाले आहे. उद्योजक म्हणून त्यांनी बजावलेल्या कामगिरीबरोबरच त्यांनी देशावरील प्रेमापोटी समाजसेवा आणि माणुसकी यांची मोठी परंपराही आपल्यामागे ठेवली आहे. त्यांचे कुटुंबीय तसेच त्यांचे लक्षावधी चाहते यांच्याबरोबर माझ्या सहवेदना आहेत.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
देशासाठी आणि देशाच्या उद्योग क्षेत्रासाठी आजचा दिवस अत्यंत दुर्दैवी आणि दुःखी आहे. रतन टाटा यांच्या जाण्याने फक्त टाटा ग्रुपला नव्हे तर प्रत्येक भारतीयाला मोठा तोटा झाला आहे. रतन टाटा यांच्या जाण्याने मी एक वैयक्तिक मित्र देखील गमावला आहे. त्यांच्या प्रत्येक भेटीनंतर मला वेगळीच प्रेरणा आणि ऊर्जा मिळत गेली. तसेच त्या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाच्या नैतिक मूल्यांवरील वरील माझा आदरही द्विगुणित होत गेला. अत्यंत दूरदृष्टीचे उद्योजक आणि समाजसेवी असलेले रतन टाटा नेहमीच समाजाच्या भल्यासाठी धडपडत होते. रतन टाटा यांच्या जाण्याने देशाने आपला एक सहृदयी पुत्र गमावला आहे.
- मुकेश अंबानी, अध्यक्ष, रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.