‘नीट’ गैरव्यवहाराच्या
चौकशीची आपची मागणी

‘नीट’ गैरव्यवहाराच्या चौकशीची आपची मागणी

पुणे, ता. ९ : वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी झालेल्या नीट परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना संशयास्पद पद्धतीने गुण दिल्याचे दिसून येते, असा दावा आम आदमी पक्षातर्फे करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली विशेष तपास समिती स्थापन करून या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, अशी मागणीही करण्यात आली. पाच मे रोजी सुमारे पाच हजार केंद्रावर झालेल्या परीक्षेसाठी २४ लाखांहून जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्याच दिवशीच परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात सुमारे ६७ विद्यार्थ्यांना समान गुण मिळाले. त्यातील सहा विद्यार्थी एकाच केंद्रातील आहेत. काही विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण (ग्रेस मार्क) देण्यात आले. लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य या परीक्षेवर अवलंबून �िर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात करिअर विषयक मार्गदर्शनपर व्याख्याने, सचित्र प्रदर्शन, आयटीआय कोर्स व पुढील शिक्षणासंदर्भातील माहिती, १०वी, १२वीनंतरचे अभ्यासक्रम व प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यात येणार आहे. तसेच, शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्तीविषयी माहिती, परदेशातील शिक्षण, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ संदर्भातील व स्वयंरोजगाराबाबत माहिती देणारे स्टॉल याठिकाणी उपलब्ध असणार आहेत. प्रामुख्याने इयत्ता १०वी, १२वीनंतर करिअर कसे निवडावे, शिक्षणाच्या विविध संधी कशा उपलब्ध होऊ शकतील, यासाठीदेखील मान्यवरांची मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत. या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचे उद्‌घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी शिवाजीनगर, कसबा, पर्वती, खडकवासला या मतदारसंघांचे आमदार, माजी नगरसेवक, विविध पदाधिकारी, विविध खात्यांतील वरिष्ठ अधिकारी आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी उपस्थित राहणार आहेत. इयत्ता ९वी ते १२वीची परिक्षा दिलेल्या उमेदवारांसह पालक व शिक्षकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपसंचालक आर. बी. भावसार यांनी केले आहे.

शिबिराविषयी
कुठे : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी सभागृह, औंध गाव
कधी : सोमवार, १० जून
वेळ : दुपारी १२.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com