टँकरवरच खर्च होतोय पाण्यासारखा पैसा

टँकरवरच खर्च होतोय पाण्यासारखा पैसा

पुणे, ता. २ ः शहराच्या मध्यवर्ती भागातील पाणीपुरवठा सुरळीत असताना मात्र उपनगरांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. गेल्या वर्षी या भागात ६३७ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. त्यात या वर्षी १११ टॅंकरची भर पडली असून, सोसायट्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्याचा फटका नागरिकांना मेंटेनन्सच्या रूपाने सहन करावा लागत आहे. सध्या समाविष्ट गावांमध्ये ७५० टॅंकरद्वारे महापालिकेकडून पाणीपुरवठा सुरू असून, मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
....

पेबल्स- १, पाटीलनगर, बावधन बुद्रुक
- सदनिकांची संख्या ः २३५
- एकूण रहिवासी ः ९००
- दिवसाला लागणारे टँकर ः १४
- एका टँकरचा खर्च ः १ हजार रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः १ हजार रुपये

पाणी विकत घ्यावे लागत असल्याने सोसायटीचे बजेट कोलमडले आहे. आम्हाला सोसायटी व्यवस्थापन खर्च दुप्पटीने द्यावा लागत आहे. पाणी व्यवस्थापनात आपण कुठे कमी पडतोय, यावर कारभारी मंडळींनी उपदेश करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे.
- रेणुका आरगे
.....
मेघ मल्हार रागा, एलएमडी चौक, बावधन
- सदनिकांची संख्या ः १४१
- एकूण रहिवासी ः ७००
- दिवसाला लागणारे टँकर ः ६-७
- एका टँकरचा खर्च ः १ हजार १०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः १ हजार रुपये

सोसायटीचा पाणी प्रश्न ‘सकाळ’ने उचलून धरल्यावर नवी जलवाहिनी बसविण्यात आली. त्यामुळे काही प्रमाणात पाणी प्रश्न सुटला होता. परंतु आता टंचाईच्या नावाखाली परत अपुरा पुरवठा सुरू झाला आहे.
- पंकज बादराणी
.....

प्राइड पॅनोरमा को-ऑफ हाउसिंग सोसायटी, सेनापती बापट रस्ता, शिवाजीनगर
- सदनिकांची संख्या : १०२
- एकूण रहिवासी : ४५०
- दिवसाला लागणारे टँकर : ५
- एका टँकरचा खर्च : १ हजार २००
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः ५००

आशानगर येथे पाण्याच्या टाकीचे उद्घाटन झाल्यावर पाणी येईल, असे आम्हाला सांगण्यात आले होते. तो आशा फोल ठरली आहे. सर्वपक्षीय आजी, माजी लोकप्रतिधींकडे गाऱ्हाणे मांडले. पाण्यासाठी आमच्याकडे मीटरदेखील बसवले आहेत. मीटरप्रमाणे पैसेदेखील द्यायला तयार आहोत. तरीही पाणी मिळत नाही. गाड्या, टेरेस, बाल्कनी धुऊ नये, असे सर्व सभासदांना सांगण्यात आले आहे. महापालिकेकडून आम्हाला पाणी मिळायला हवे.
- रोहिता आजगावकर, शीतल कराणी
.....

अल्डिया एस्पॅनोला, महाळुंगे
- सदनिकांची संख्या : १८४
- एकूण रहिवासी : ७६०
- दिवसाला लागणारे टँकर : १२
- एका टँकरचा खर्च : १ हजार ५०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः ५०० रुपये

आमच्याकडे महापालिकेचे पाणी येत नसल्याने आम्हाला पूर्णपणे टॅंकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्यावर मासिक खर्च होतो.
- केतकी रोहित सुरतवाला

...

मेट्रो जॅझ, महाळुंगे
- सदनिकांची संख्या : २३६
- एकूण रहिवासी : १०००
- दिवसाला लागणारे टँकर : २
- एका टँकरचा खर्च : १ हजार ५००
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः ६०० रुपये

आमच्या सोसायटीला अजूनही जलवाहिनी नाही. त्यातच बोअरचे पाणी आटले आहे. महापालिकेकडून पाणी देऊ, असे सांगितले गेले. परंतु त्याला दीड-दोन वर्षे लागतील असे सांगण्यात येत आहे. तोपर्यंत रोज आम्हाला पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यामुळे हे आमच्या बजेटच्या बाहेर आणि असुविधाकारक आहे.
- डॉ. प्रीती काळे
.....
ग्रीन झोन अपार्टमेंट, बाणेर
- सदनिकांची संख्या : १४४
- एकूण रहिवासी : ३५०
- दिवसाला लागणारे टँकर : ४
- एका टँकरचा खर्च : २ हजार ५००
- वाढलेला मेंटेनन्स ः ३ हजार रुपये (वार्षिक)

पुणे महापालिकेकडून कोणत्याही सोयीसुविधा नाहीत. पाणी प्रश्न गंभीर आहे. आम्ही घरात खूप काटकसर करून पाणी वापरतो. बंगळुरुसारखी परिस्थिती आम्हाला नको. महापालिकेकडून मिळणारे पाणी पुरेसे नाही. बाहेरून टँकर मागवावे लागतात.
- भाग्यश्री मालपाठक
....
व्हेनिजिया सोसायटी, बाणेर
- सदनिकांची संख्या - १७९
- एकूण रहिवासी : ७१६
- दिवसाला लागणारे टँकर ः ७ ते ८
- एका टँकरचा खर्च ः १ हजार
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः नाही

आमची सोसायटी मोठी असल्यामुळे महापालिकेकडून वापरासाठीचे पाणी तीन दिवसांतून एकदा येते. सोसायटीत एसटीपी प्लांट आहे. पण पाण्याला खूप दुर्गंधी येते. दुसरे पाणी नाही. त्यामुळे फ्लश किंवा बागेसाठी हे पाणी वापरावे लागते. त्यामुळे आरोग्याचा गंभीर निर्माण झाला आहे.
- जयू जमाखंडे
....

नंदन स्पेक्ट्रा, बाणेर
- सदनिकांची संख्या : २१९
- एकूण रहिवासी : ९००
- दिवसाला लागणारे टँकर : ५ ते ६
- एका टँकरचा खर्च : १ हजार २०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः नाही

आमच्या सोसायटीला महापालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. पण तो रेसा नाही. आम्हाला बाहेरून टँकर आणावे लागतात.
- संपदा जोशी
....

गंगा ॲक्रो पॉलिस को. हाउसिंग सोसायटी, बाणेर
- सदनिकांची संख्या : २८०
- एकूण रहिवासी : ११५० जवळपास
- दिवसाला लागणारे टँकर : १० ते १२
- एका टँकरचा खर्च : १ हजार २००
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः नाही

आमच्या सोसायटीत महापालिकेकडून अजिबात पाणीपुरवठा केला जात नाही. आम्ही महापालिका हद्दीत राहतो, कर पण भरमसाठ भरतो. पण सोयीसुविधा मात्र शून्य आहेत. आमच्या भागात ना पाणी, ना रस्ता. टँकरवर पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो.
- श्रद्धा गायकवाड
.....

मोरया स्पर्श सोसायटी, किरकटवाडी
- सदनिकांची संख्या : २४०
- एकूण रहिवासी : १०००
- दिवसाला लागणारे टँकर : १५
- एका टँकरचा खर्च : ८०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः १०० रुपये

आमच्या सोसायटीत दिवसाआड पाणी येते. महापालिकेकडून जे पाणी सोडण्यात येते, ते एकच तास असते. ते आम्हाला पुरत नाही. त्यामुळे आमचे पाण्यासाठी खूप हाल होत आहेत. आम्हाला खासगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते.
- नलिनी थोपटे
......

ऑक्सिजन व्हॅली गृहरचना सोसायटी, नऱ्हे
- सदनिकांची संख्या : १७६
- एकूण रहिवासी : ६००
- दिवसाला लागणारे टँकर : १०
- एका टँकरचा खर्च : १ हजार १०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः १०० रुपये

आमच्या भागात महापालिका फक्त दोन तास पाणी दिवसाआड सोडते. त्यामुळे ते पाणी आमच्या सोसायटीला पुरत नाही. आम्ही हा खर्च महिन्याच्या मेंटनेंस मधून खर्च करीत आहे. आमचा जास्त खर्च पाण्यावर होत असल्याने बाकीच्या सुविधा सोसायटीमध्ये देता येत नाही.
- स्मिता काकडे
....

साद रेसिडेन्सी, नऱ्हे
- सदनिकांची संख्या ः ८०
- एकूण रहिवासी ः ४००
- दिवसाला लागणारे टँकर ः ५
- एका टँकरचा खर्च ः ८०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः १५०० महिना

आमचा परिसर महापालिकेत समाविष्ट होऊन तीन वर्षे झाली तरीही महापालिका साधे पिण्याचे पाणीदेखील देऊ शकली नाही. तसेच पाण्याच्या टँकरमुळे आमचे महिन्याचे आर्थिक गणितदेखील कोलमडले असून, नियोजन करणे अवघड जात आहे.
- अश्विनी शिंदे
....
सिद्धांत शिवसृष्टी, मानाजीनगर, नऱ्हे
- सदनिकांची संख्या : १२०
- एकूण रहिवासी : ४८०
- दिवसाला लागणारे टँकर : ५
- एका टँकरचा खर्च : ८०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स : १२०० महिना

मनपामध्ये समाविष्ट होऊन तीन वर्षे झाले असून महानगरपालिका साधे आम्हाला पिण्याचे पाणी देखील देऊ शकले नाही तसेच पाण्याच्या टँकर मुळे आमचे महिन्याचे आर्थिक गणित देखील कोलमडले असून नियोजन करणे अवघड जात आहे.
- मंगल भानुदास साठे, रहिवासी
....

३. सोसायटीचे नाव व पत्ता ः मीडिया Rejency, नऱ्हे
- सदनिकांची संख्या ः१५१
- एकूण रहिवासी ः३१०
- दिवसाला किती टँकर लागतात ः४
- एका टँकरचा खर्च किती ः८००
- टँकरमुळे प्रत्येक फ्लॅटधारकाकडून सोसायटी किती पैसे घेते ः १७०० महिना

मनपामध्ये समाविष्ट होऊन तीन वर्षे झाले असून महानगरपालिका साधे आम्हाला दररोज पिण्याचे पाणी देखील देऊ शकले नाही तसेच आमच्या कडून पाणी कर वसूल करतात.
- स्वाती खताळ, रहिवाशी
....
४) सोसायटीचे नाव व पत्ता ः रमणा सृष्टी, नऱ्हे
- सदनिकांची संख्या ः५६
- एकूण रहिवासी ः२००
- दिवसाला किती टँकर लागतात ः२
- एका टँकरचा खर्च किती ः८००
- टँकरमुळे प्रत्येक फ्लॅटधारकाकडून सोसायटी किती पैसे घेते ः १००० महिना

मनपामध्ये समाविष्ट होऊन तीन वर्षे झाले असून महानगरपालिका सा देखील कोलमडले असून नियोजन करणे अवघड जात आहे.
- जयश्री सूर्यवंशी, रहिवासी
....
५. सोसायटीचे नाव व पत्ता ः देवर्षी कॉम्प्लेक्स, नऱ्हे
- सदनिकांची संख्या ः २४२
- एकूण रहिवासी ः ५००
- दिवसाला किती टँकर लागतात ः६
- एका टँकरचा खर्च किती ः८००
- टँकरमुळे प्रत्येक फ्लॅटधारकाकडून सोसायटी किती पैसे घेते ः १५०० महिना

मनपामध्ये समाविष्ट होऊन तीन वर्षे झाले असून महानगरपालिका साधे आम्हाला पिण्याचे पाणी देखील देऊ शकले नाही तसेच पाण्याच्या टँकर मुळे आमचे महिन्याचे आर्थिक गणित देखील कोलमडले असून नियोजन करणे अवघड जात आहे.
- अम्ब्रीन काझी, रहिवासी
....

६) सोसायटीचे नाव व पत्ता : पारी टॉवर्स, पारी चौक, नऱ्हे-धायरी रोड, नऱ्हे - ४११०४१
- सदनिकांची संख्या : २५३
- एकूण रहिवासी : ७५९
- दिवसाला किती टँकर लागतात : १२-१३
- एका टँकरचा खर्च किती : ८००
- टँकरमुळे प्रत्येक फ्लॅटधारकाकडून सोसायटी किती पैसे घेते : १५०० महिना

सोसायटीतील सर्व सदस्य मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत, प्रत्येक सदस्याने गृहकर्ज घेतले आहे आणि सदनिका खरेदी केला आहे. सध्या पाणी आणि कचरा यासाठी वेगळा खर्च आहे. प्रत्येकाचे महिन्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. नऱ्हे महापालिकेत समाविष्ट होऊन ३ वर्षे झाली तरी महापालिका पाण्याची सुविधा उपलब्ध करून देता येत नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. तसेच रस्ते, कचरा अशा अनेक समस्या आहेत.
- प्राजक्त तट्टू, रहिवासी, पारी टॉवर्स
....

७) सोसायटीचे नाव व पत्ता - निर्मिती नेस्ट सोसायटी, नऱ्हे
- सदनिकांची संख्या ः८०
- एकूण रहिवासी ः३२०
- दिवसाला किती टँकर लागतात ४
- एका टँकरचा खर्च किती ः८००
- टँकरमुळे प्रत्येक फ्लॅटधारकाकडून सोसायटी किती पैसे घेते ः १५०० महिना

मनपामध्ये समाविष्ट होऊन तीन वर्षे झाले असून महानगरपालिका साधे आम्हाला पिण्याचे पाणी देखील देऊ शकले नाही तसेच पाण्याच्या टँकर मुळे आमचे महिन्याचे आर्थिक गणित देखील कोलमडले असून नियोजन करणे अवघड जात आहे.
- मानसी कुलकर्णी ,रहिवासी
....
एम १ ए परांजपे अभिरुची, नऱ्हे
- सदनिकांची संख्या : १७२
- एकूण रहिवासी : ४२०
- दिवसाला किती टँकर लागतात : ६
- एका टँकरचा खर्च किती : ८००
- टँकरमुळे प्रत्येक फ्लॅटधारकाकडून सोसायटी किती पैसे घेते:१२००

गेल्या तीन वर्षापासून परांजपे अभिरुची परिसर धायरीत राहतो. जानेवारी २०२४ रोजी आम्ही चार जागृत सदस्यांनी सोसायटीमध्ये हक्काचे पाणी येण्यासाठी मनपाकडे अर्ज करून पाठपुरावा केला. मनपाचे अपुरे पाणी येत आहे. त्यामुळे खासगी टँकरवर जास्तीचे पैसे खर्च होत आहेत.
- अँड. वैशाली हिरवे
.....

आदित्य ब्रीज पार्क सोसायटी, बालेवाडी
- सदनिकांची संख्या : १४०+ २३ रो हाउस
- एकूण रहिवासी : ५००
- दिवसाला लागणारे टँकर : १० ते १२
- एका टँकरचा खर्च : १००० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः नाही

आमच्या सोसायटीत गेल्या महिन्यापासून पाणी प्रश्न जाणवत आहे. पिण्यासाठी महापालिकेचा एक टँकर दिला जातो. तो पुरत नाही. मग बाहेरून टँकर आणावे लागतात. महापालिकेकडून आम्हाला अजिबातच पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे आमचे पाण्यासाठी खूप हाल होत आहेत. आम्हाला खासगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते.
- मोनिका निगम
....

कम्फर्ट झोन सोसायटी, बालेवाडी
- सदनिकांची संख्या : ५४०
- एकूण रहिवासी : २७००
- दिवसाला लागणारे टँकर ः २२
- एका टँकरचा खर्च ः १ हजार रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः नाही

आमची सोसायटी मोठी असल्यामुळे महापालिकेकडून दिले जाणारे पाणी पुरत नाही. प्रत्येक घरासाठी सोसायटीकडून १०० लिटर पाणी हे स्वयंपाक
व पिण्यासाठी दिले जाते. ते पाणी फारच जपून वापरावे लागते. पाणी प्रश्न गंभीर आहे. तो लवकर सोडवावा.
- अनिता कामत
....

फोर्टी थ्री प्रीव्हिएट सोसायटी, बालेवाडी
- सदनिकांची संख्या : २८८
- एकूण रहिवासी : १७५०
- दिवसाला लागणारे टँकर : ७ ते ८
- एका टँकरचा खर्च : १ हजार रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः नाही

महापालिकेकडून आमच्या सोसायटीला होणारा पाणीपुरवठा अपुरा आहे. निदान नियमानुसार तरी माणसी पाणी मिळावे, ही अपेक्षा आहे. कारण सर्व कर भरूनही पुरेसे पाणी मिळत नाही. मग बाहेरून टँकर आणावे लागतात.
पल्लवी बालवडकर
....
परफेक्ट टेन सोसायटी, बालेवाडी
- सदनिकांची संख्या : ३२८
- एकूण रहिवासी : १३१२
- दिवसाला लागणारे टँकर : १ (४० हजार लिटर)
- एका टँकरचा खर्च : ४ हजार रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः नाही

आमच्या सोसायटीला नियमित पाणीपुरवठा होत नाही. कधी कमी, तर कधी जास्त पाणी येते. त्यामुळे टँकर घ्यावे लागतात. टँकरचे पाणी खराब आले, तर लहान मुले वरच्या वर आजारी पडतात. मागच्या उन्हाळ्यात अशीच परिस्थिती होती. फक्त आश्वासने दिली गेली. मात्र अजून तरी ती पूर्ण झालेलीच नाहीत.
- योगिता मानका
....
साई ईशान्य, बालेवाडी
- सदनिकांची संख्या : १२८
- एकूण रहिवासी : ५१२ जवळपास
- दिवसाला लागणारे टँकर : ७ ते १०
- एका टँकरचा खर्च : १ हजार रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः नाही

हा परिसर सगळ्या सोयीसुविधांनी युक्त आहे, असे ऐकले होते. म्हणूनच येथे घर घेतले. कोटी रुपये खर्च करून फ्लॅट घेतला आणि आता पाणी पाणी करावे लागत आहे. घरात खूप काटकसर करून पाणी वापरावे लागते.
- मंजिरी चांदोरकर
....

फ्युजन सोसायटी, कोंढवे-धावडे
- सदनिकांची संख्या : २६९
- एकूण रहिवासी : ११४०
- दिवसाला लागणारे टँकर : १०
- एका टँकरचा खर्च : १ हजार रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः २०० रुपये

तीन-चार वर्षांपूर्वी या ठिकाणी पुरेसे पाणी होते. मात्र या भागातील मुख्य जलवाहिनीही कमी इंचाची असल्याने पाणीपुरवठा कमी होतो.
त्यामुळे मुख्य जलवाहिनी मोठी असायला हवी.
- वैशाली मोरे
....

मनोजा रेसिडेन्सी सोसायटी, कोंढवे-धावडे
- सदनिकांची संख्या : १३६
- एकूण रहिवासी : ७५०
- दिवसाला लागणारे टँकर : २
- एका टँकरचा खर्च : १ हजार २०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः २०० रुपये

महापालिकेकडून पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे आम्हाला टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
- मायादेवी गिरासे
....

वसुंधरा सोसायटी, कोपरे
- सदनिकांची संख्या : १४०
- एकूण रहिवासी : ६३०
- दिवसाला लागणारे टँकर : १
- एका टँकरचा खर्च : ८०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः नाही

महापालिकेकडून कधी कधी कमी पाणीपुरवठा होतो. वापरायचा टँकर ८०० रुपयांना, तर पिण्याचा टँकर १२०० रुपयांना मिळतो. बोअरवेलच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. सर्व सदनिकाधारकांना पाणी जपून वापरण्याच्या सूचना दिल्या आहे.
- भारती मोरे
....

साई आविष्कार सोसायटी, धायरी
- सदनिकांची संख्या : १७६
- एकूण रहिवासी : ९००
- दिवसाला लागणारे टँकर : ९
- एका टँकरचा खर्च : ८०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः ८०० रुपये

महापालिकेकडून नियमित पाणीपुरवठा होत नाही. तो पुरेशा दाबानेदेखील नसतो. परिणामी नेहमीच आम्हाला पाण्याची कमतरता जाणवते. सध्या बोअरवेल आहेत. परंतु त्याचे पाणी उन्हाळ्यामुळे कमी मिळत आहे. आमच्या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा.
- नीलेश गुल्हाने
...
कमल ग्रीन लीप सोसायटी, किरकटवाडी
- सदनिकांची संख्या : २५६
- एकूण रहिवासी : १२५०
- दिवसाला लागणारे टँकर : २
- एका टँकरचा खर्च : ८०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः ५०० रुपये

महापालिकेकडून कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. परिणामी त्याची झळ प्रत्येक सदनिकाधारकाला बसते. आमच्या इमारतीत बोअरवेलचा वापर होतो. उन्हाळा सुरू झाल्याने बोअरवेलचे पाणी कमी पडते. सध्या एक-दोन टँकर मागवावे लागतात. आमच्या गावापासून दीड किलोमीटरवर खडकवासला धरण आहे. परंतु आमच्या सोसायटीत पुरेसे पाणी मिळत नाही.
- नभा चिटणीस
....

सुख स्वप्न सोसायटी, किरकटवाडी
- सदनिकांची संख्या : १०६
- एकूण रहिवासी : ५००
- दिवसाला लागणारे टँकर : ५
- एका टँकरचा खर्च : ८०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः ८०० रुपये

सोसायटीत १०६ सदनिकांसाठी महापालिकेचा एक इंचाचा नळजोड आहे. महापालिकेने लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा करावा. अजून किमान चार नळजोड पाहिजेत. सोसायटीमध्ये चार विंधनविहिरी आहेत. त्यातील तीन आता बंद पडल्या आहेत.
- मंगल माताळे, सुख स्वप्न सोसायटीतील ग्रामस्थ
...

विजयनगर, धायरी
- सदनिका ः १९८
- रहिवासी : ६१०
- दिवसाला लागणारे टँकर : ६
- एका टँकरचा खर्च : ७०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः नाही

एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो. कधी अर्धा तास, एक तास पाणीपुरवठा होतो. कधी दोन दिवसांनी पाणी येते. नियमित पाणीपुरवठा नाही. पुरेशा दाबाने पाणी सोडले जात नाही. महापालिकेचा कर भरूनदेखील आम्हाला सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. वर्षभर खासगी टँकरद्वारेच आमचा पाणीपुरवठा होतो.
- रूपाली साळवे
.....

वृंदावन सोसायटी, धायरी
- सदनिका ः ८८
- रहिवासी ः २८०
- दिवसाला लागणारे टँकर : ३
- एका टँकरचा खर्च : ७५० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः नाही

एक दिवसाआड पाणीपुरवठा होतो, त्यामुळे पाणी पुरत नाहीत. शिवाय जे पाणी सोडण्यात येते, ते जेमतेम एक तास असते. महापालिकेचा कर भरूनदेखील आम्हाला किमान पाण्यासारखी सुविधादेखील मिळत नाही. खासगी टँकरवरच आमची संपूर्ण भिस्त आहे.
- योगिता भोसले
.....

ब्ल्युबेरी सोसायटी, काळेपडळ
- सदनिकांची संख्या : २७०
- एकूण रहिवासी : १२५०
- दिवसाला लागणारे टँकर : २४
- एका टँकरचा खर्च : ७५० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः नाही

महापालिका मिळकतकर घेऊन पाण्याबाबत अन्याय करीत आहे. भरमसाट खर्च करूनही पाण्याचा तुटवडा सहन करावा लागत आहे.
- हरिओम पांचाळ
....
इशा एम्पायर हाउसिंग सोसायटी, हडपसर
- सदनिकांची संख्या : २१६
- एकूण रहिवासी : ५७०
- दिवसाला लागणारे टँकर : १७
- एका टँकरचा खर्च : ६५० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः नाही

महापालिकेने पाण्याचे योग्य नियोजन केले पाहिजे. किमान सध्याच्या उन्हाळ्यात तरी पाणी देण्याची गरज आहे.
- कुंजन वंदे
....

सुयोग निसर्ग, लोहगाव रस्ता, वाघोली
- सदनिकांची संख्या : ५११
- एकूण रहिवासी : २०००
- दिवसाला लागणारे टँकर ः १५
- एका टँकरचा खर्च ः २ हजार रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः १ हजार ५०० रुपये

पाण्यावर खूपच खर्च होतो. दररोज १५ ते २० टँकर घ्यावे लागतात. लाखोंचा खर्च होतो. हा खर्च करा, महापालिकेचा करही भरा. किती आर्थिक बोझा सहन करायचा. महापालिकेने लवकरात लवकर पाण्याची व्यवस्था करावी.
- सोसायटीधारक महिला
...

सवाना एक, बायफ रस्ता, वाघोली
- सदनिकांची संख्या ः ५००
- एकूण रहिवासी -- २०००
- दिवसाला लागणारे टँकर ः २०
- एका टँकरचा खर्च ः ८०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः १ हजार २०० रुपये

महापालिकेकडून सोसायटीला पाणी मिळत नाही. यामुळे टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. पाण्यावर प्रत्येक सदनिकाधारकांचा सुमारे १५०० रुपये खर्च होतो. महापालिकेने पुरेसा पाणीपुरवठा करावा.
- वृषाली वाघोलीकर
....
गगन अधिरा, बकोरी फाटा, वाघोली
- सदनिकांची संख्या ः २७५
- एकूण रहिवासी -- १२००
- दिवसाला लागणारे टँकर ः १५
- एका टँकरचा खर्च ः १००० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः १ हजार ५०० रुपये

आम्ही कर भरतो, तर महापालिकेकडून सुविधा मिळायलाच हव्यात. मूलभूत गरज असलेले पाणीही मिळत नाही. पाण्यावर भरमसाट खर्च होतो. पाणी विकतच घ्यावे लागते.
- सारिका हरगुडे
....
न्याती ईलान वेस्ट, बकोरी रस्ता, वाघोली
- सदनिकांची संख्या ः ५००
- एकूण रहिवासी ः २०००
- दिवसाला लागणारे टँकर ः १५
- एका टँकरचा खर्च ः १५०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः १ हजार ५०० रुपये
....
युनिक रेसिडेन्सी, भावडी रस्ता, वाघोली
- सदनिकांची संख्या ः १२२
- एकूण रहिवासी ः ५००
- दिवसाला लागणारे टँकर ः ७
- एका टँकरचा खर्च ः ७०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः ५०० रुपये

वाघोलीत मूलभूत सुविधांचा अभाव आहे. महापालिका केवळ कर घेते. सुविधा मात्र पुरविल्या जात नाहीत. सोसायट्यांना महापालिका पाणी पुरवत नसेल तर टँकर सुरू करावेत.
- प्रीती पाठक

कोणार्क ऑर्किड, केसनंद रस्ता,
- सदनिकांची संख्या ः ५१०
- एकूण रहिवासी ः २०००
- दिवसाला लागणारे टँकर ः १५
- एका टँकरचा खर्च ः १००० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः १ हजार ५०० रुपये

महापालिका सोसायट्यांना कधी पाणीपुरवठा करणार आहे. पाण्यावरच खर्च करण्याची वेळ आमच्यावर येते. ज्या पाणी योजनांचे काम सुरू आहे, ते लवकर पूर्ण करून पाणीपुरवठा करावा.
- अर्चना कटके

गुलमोहर पार्क, बकोरी रस्ता
- सदनिकांची संख्या ः २००
- एकूण रहिवासी ः ८००
- दिवसाला लागणारे टँकर ः १५
- एका टँकरचा खर्च ः १ हजार ४०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः १ हजार ५०० रुपये

ड्रीम संकल्प, बकोरी रस्ता, वाघोली
- सदनिकांची संख्या ः ४३२
- एकूण रहिवासी ः १६५०
- दिवसाला लागणारे टँकर ः ८
- एका टँकरचा खर्च ः १ हजार ८०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः १ हजार ३०० रुपये

वाघोलीतील पीएमआरडीएच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम रखडलेले आहे. भामा आसखेडचे पाणी कधी येणार, याची शाश्वती नाही. मग वाघोलीला पाणी कुठून मिळणार. पाणीपट्टी वसुल करता, मग पाणी देणार कोण? आम्ही फक्त पाण्यावरच खर्च करायचा का? पाण्याच्या खर्चामुळे आमचे बजेट कोलमडते.
- विनिता जमधडे
...
ड्रीम्स नंदिनी हाउसिंग सोसायटी, मांजरी शेवाळेवाडी फाटा पुणे सोलापूर रोड
- सदनिकांची संख्या : २४७
- एकूण रहिवासी : १३००
- दिवसाला किती टँकर लागतात : २३
- एका टँकरचा खर्च किती : प्रति टँकर खर्च ८००/-
- टँकरमुळे प्रत्येक फ्लॅटधारकाकडून सोसायटी किती पैसे घेते : प्रति महिना रुपये १०००/-

"तीन वर्षापूर्वी गाव पालिकेत गेले आहे. मात्र, आजूनही पालिकेकडून पाणीपुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे पाण्याच्या मोठ्या प्रश्नाला तोंड द्यावे लागत आहे. आम्हाला खासगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते.''
स्वाती पांढरे
....
२. सोसायटीचे नाव व पत्ता : गंगा व्हिलेज सोसायटी, हांडेवाडी रोड
- सदनिकांची संख्या : ६७२
- एकूण रहिवासी : ३५००
- दिवसाला किती टँकर लागतात : २५
- एका टँकरचा खर्च किती : प्रति टँकर खर्च ८००/-
- टँकरमुळे प्रत्येक फ्लॅटधारकाकडून सोसायटी किती पैसे घेते : प्रति महिना रुपये १०००/-

"महानगरपालिकेकडून अत्यंत कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. नियमानुसार सभासदांच्या प्रमाणात पाण्याचे कनेक्शन मिळाले पाहिजेत. मात्र, अधिकारी कागदपत्रांमध्ये त्रुटी दाखवून कनेक्शन देण्यास असमर्थता दाखवतात. त्याचवेळी काही सोसायटींना बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात कनेक्शन दिली जातात. सेलेना पार्क टाकीचा कोणताही फायदा हांडेवाडी रोडच्या सोसायट्यांना झालेला नाही.''
- योगेंद्र गायकवाड
....
कुमार पेब्बल पार्क, हांडेवाडी रस्ता
- सदनिकांची संख्या : ८००
- एकूण रहिवासी : ३०००
- दिवसाला लागणारे टँकर : ४०
- एका टँकरचा खर्च : ६५० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः २ हजार ५०० रुपये

महापालिका अखत्यारित असूनसुद्धा पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. टँकरवर अमाप पैसा खर्च होतो, तरीसुद्धा पाण्याची प्रचंड गैरसोय होते.
- अतुल फड
....

सत्यम निरंजनी सोसायटी, काळेपडळ
- सदनिकांची संख्या : १७६
- एकूण रहिवासी : ८००
- दिवसाला लागणारे टँकर ः ५
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः २ हजार ६०० रुपये

आमच्या सोसायटीत महापालिकेचे पाणी येत होते. परंतु जलवाहिनी जुनी असल्यामुळे दूषित पाणी येत होते, ते बंद केले आहे. नवीन वाहिनी नावापुरती टाकून दिलेली आहे. पण अजूनही त्याचे कनेक्शन जोडून पाणी सुरू केलेले नाही. सध्या महापालिकेकडून एक दिवसाआड टँकर दिला जातो. तो पुरेसा नाही. नवीन वाहिनीला पाण्याचे कनेक्शन जोडून तातडीने पाणी सुरू करावे. आम्ही महापालिकेचा मिळकतकर वेळेत भरत असतो तरीसुद्धा आम्हाला पिण्याचे पाणी मिळत नाही.
- संजय माळी
....

किंग्स वे सोसायटी, बी. टी. कवडे रस्ता
- सदनिकांची संख्या ः १५०
- एकूण रहिवासी ः ६००
- दिवसाला लागणारे टँकर ः१०
- एका टँकरचा खर्च ः ८०० ते ९००
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः ५०० ते १००० रुपये

मार्च महिन्यापासून दररोज साधारण आठ ते दहा टँकर पाणी मागवावे लागत आहेत. सोसायटीतील बोअरिंगला पाणी खूप कमी आहे. त्यामुळे वापरासाठी आणि सोसायटीतील गार्डन आणि इतर कामांसाठी टँकर मागवावे लागतात. यामुळे आमच्या एकूण खर्चात वाढ झाली आहे. सोसायटीला पाण्यासाठीचे वेगळे बजेट तयार करावे लागत आहे.
- सारिका कदम
....

यलो ब्लासम, बी. टी. कवडे रस्ता
- सदनिकांची संख्या ः २६०
- एकूण रहिवासी ः १००० पेक्षा जास्त
- दिवसाला लागणारे टँकर ः ५ ते ६
- एका टँकरचा खर्च ः ८०० ते ९००
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः याच महिन्यात सुरू केले आहेत.

या महिन्याच्या सुरवातीपासून दररोज साधारण ५ ते सात टँकर पाणी मागवावे लागत आहेत. सोसायटीतील दोन्ही बोअरिंगचे पाणी बंद झाले असून टँकर मागवावे लागत आहेत. यामुळे आमच्या एकूण खर्चात वाढ झाली आहे.
- मोहन सूर्यवंशी
.....
नरेन हिल्स सोसायटी, वानवडी
- सदनिकांची संख्या ः १८०
- एकूण रहिवासी ः ७२०
- दिवसाला लागणारे टँकर ः ६ ते ८
- एका टँकरचा खर्च ः १४०० ते १६००
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः ८०० ते १००० रुपये

सोसायटी सगळा कर भरूनदेखील पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने रोज जवळपास ६ ते ८ टॅंकर मागवावे लागतात. सोसायटीच्या देखभाल खर्चातून एक ते दीड लाख रुपये फक्त पाण्याच्या टॅंकरवर खर्च करावे लागतात. त्यामुळे सोसायटीमधील इतर कामांवर परिणाम झाला आहे. सोसायटीसमोर असलेल्या वनविभागाच्या जागेत वनउद्यानाचे काम सुरू असून, त्यासाठी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. परंतु समोर असलेल्या सोसायटीमधील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यास निधी नाही, असे उत्तर मिळत आहे. यामुळे सर्व सदस्य त्रस्त झाले आहेत.
- क्षितीजा मोडेश्वर
......

प्राइड आशियाना, धानोरी
- सदनिकांची संख्या ः ५१७
- एकूण रहिवासी ः साधारण ३ हजार
- दिवसाला लागणारे टँकर ः २० ते २५
- एका टँकरचा खर्च ः ६०० ते ८०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला मेंटेनन्स ः ३ हजार रुपये

चार-पाच दिवसातून एखाद्या दिवशी पाणी येते. तेही पुरेसे नसते. आमची सोसायटी धानोरी व लोहगावच्या सीमेवर आहे. या भागातील टाकी अपूर्ण आहे. त्यामुळे महापालिकेने टाकीचे काम त्वरित पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करावा. खासगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. सोसायटीचा महिन्याला तीन ते चार लाख रुपयांवर पाण्यावर खर्च होतो.
- अश्‍विनी लोखंडे

झेस्ट काउंटी, धानोरी
- सदनिकांची संख्या ः १६४
- एकूण रहिवासी ः साधारण ६०० ते ६५०
- दिवसाला लागणारे टँकर ः ४ टँकर
- एका टँकरचा खर्च ः १५०० ते १६००
- टँकरमुळे वाढलेला मेंटेनन्स ः ३ हजार ५०० रुपये

महापालिकेकडून आमच्या भागात आणि सोसायटीलाही पाण्याची वाहिनी नाहीच. पाणीपट्टी मात्र आकारली जाते. पाण्याच्या टाकीचे रेंगाळलेले काम लवकर करून महापालिकेने पाणीपुरवठ्याची सोय करावी, ही आमची मागणी आहे.
- नीलम गायकवाड

सेव्हन हेवन सोसायटी, धानोरी
- सदनिकांची संख्या ः १७४
- एकूण रहिवासी ः १ हजार
- दिवसाला लागणारे टँकर ः ३ टँकर
- एका टँकरचा खर्च ः ९५०
- टँकरमुळे वाढलेला मेंटेनन्स ः २ हजार ७०० रुपये

पिण्याचे पाणी दोन तास येते. पण तेही कमी दाबाने. वापरण्याच्या पाण्यासाठी टँकर मागवावे लागतात. कर पूर्ण घेतला जातो. पण कुठलीही सुविधा मिळत नाही. सोसायटीसमोरून जलवाहिनी गेली आहे, पण आत पाण्याची सुविधा नाही. पंधरा वर्षांपासून सांडपाण्याचीही सोय नाही.
- भक्ती साळुंखे

तिरूपती कॅम्पस, टिंगरेनगर
- सदनिकांची संख्या ः २००
- एकूण रहिवासी ः १ हजार
- दिवसाला लागणारे टँकर ः ६
- एका टँकरचा खर्च ः १ हजार रुपये
- टँकरमुळे वाढलेला मेंटेनन्स ः २० हजार (वार्षिक)

पिण्याचे पाणी कमी दाबाने असते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी रोज टँकरवरच अवलंबून राहावे लागते. वापरण्यासाठी सोसायटीत विहीर आहे. त्यामुळे विहिरीचे पाणी घेतले जाते. या वर्षी पाण्याचा तुटवडा जास्त प्रमाणात जाणवत आहे.
- संध्या शेलार
....
व्यंकटेश ग्राफिटी, केशवनगर
- सदनिकांची संख्या ः ९६८
- एकूण रहिवासी ः ४०००
- दिवसाला लागणारे टॅंकर ः ६०
- एका टॅंकरचा खर्च ः ७०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः ३ हजार रुपये

गाव सहा वर्षांपूर्वी महापालिकेत गेले. तरी महापालिका आम्हाला पाणीपुरवठा करू शकली नाही. पाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन
करावा लागत आहे.
- लिला नष्टे
...
गोदरेज इन्फिनिटी, केशवनगर
- सदनिकांची संख्या ः १२००
- एकूण रहिवासी ः ४५००
- दिवसाला लागणारे टॅंकर ः ७५
- एका टॅंकरचा खर्च ः ६५० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः १ हजार रुपये

आम्हाला दिवसाला ७५ टॅंकर येतात. आम्ही ३ कोटी रुपये महापालिकेला कर भरतो. मात्र महापालिका पाणी पुरवू शकत नाही. महापालिकेने पिण्यासाठी दिवसाला दोन टॅंकर द्यावेत.
- अर्चना गोसावी
....
फ्लोरीडा रिव्हर वॉल्क, केशवनगर
- सदनिकांची संख्या ः २२४
- एकूण रहिवासी ः ११००
- दिवसाला लागणारे टॅंकर ः १८
- एका टॅंकरचा खर्च ः ६०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः २ हजार रुपये

आमच्या सोसायटीपर्यंत महापालिकेने जलवाहिनी टाकलेली नाही. त्यामुळे आम्हाला टॅंकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. उन्हाळ्यात टॅंकरचे दर वाढतात. त्यामुळे आर्थिक भार पडतो. महापालिका कधीपर्यंत वाहिनी टाकते, हे सांगता येत नाही.
- भाविका तवर

बेलकॅसल सोसायटी, केशवनगर
- सदनिकांची संख्या ः ३७५
- एकूण रहिवासी ः १५००
- दिवसाला लागणारे टॅंकर ः १२
- एका टॅंकरचा खर्च ः ८०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः ६७० रुपये

महापालिका सोसायटीकडून मोठ्या प्रमाणात मिळकतकर वसूल करते. मग आम्हाला महापालिकेने पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
- शारदा झवर
...

स्काय सोसायटी, पिसोळी
- सदनिकांची संख्या : १५०
- एकूण रहिवासी : २५००
- दिवसाला लागणारे टॅंकर : ५ टॅंकर
- एका टॅंकरचा खर्च ः १ हजार २०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः ५०० रुपये

महापालिकेकडून मूलभूत सुविधाच दिल्या जात नाहीत. पूर्ण पिसोळीसाठी केवळ तीन टॅंकर दिले जातात. उन्हाळा पाहून खासगी टँकरची दरवाढ केली असल्याने कुटुंबावरील आर्थिक भार वाढत आहे. महापालिकेने मोफत टँकरची व्यवस्था केल्यास विकतचे टॅंकर घ्यावे लागणार नाहीत आणि आम्हालाही दिलासा मिळेल.
- स्नेहल दगडे
....
न्याती इस्टेट, पिसोळी
- सदनिकांची संख्या : ४००
- एकूण रहिवासी : २०००
- दिवसाला लागणारे टँकर : २५
- एका टँकरचा खर्च : ७५० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः ८०० रुपये

पाणीपुरवठा विभागाकडून कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात आहे. आम्ही महापालिकेचा मिळकतकर वेळेत भरत असूनही सभासदांना पुरेल एवढे पाणी मिळत नाही. त्यामुळे आम्हाला खासगी टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते.
- आशिष मोमया
....
न्याती विक्टोरिया, महंमदवाडी
- सदनिकांची संख्या : १७५
- एकूण रहिवासी : ७५०
- दिवसाला लागणारे टँकर : १५
- एका टँकरचा खर्च : ८०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः ६०० रुपये

सध्या पाण्याची वेळ निश्चित नाही. त्यामुळे आमचे सर्वसामान्य नागरिकांचे पाण्यासाठी खूप हाल होत आहेत. खासगी टँकरसाठी आम्ही किती खर्च करावा; महापालिकेने निदान टँकर पुरवठा करावा, अशी आमची इच्छा आहे. परंतु दाद कोणाकडे मागायची?
- साधना नागला
....
न्याती एन्क्लेव्ह, महंमदवाडी
- सदनिकांची संख्या : २८८
- एकूण रहिवासी : १२००
- दिवसाला लागणारे टँकर : २४-२६
- एका टँकरचा खर्च : ७५० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः १ हजार रुपये

आमच्या सोसायटीत महापालिकेचे पाणी रोज एक तास उशिरा मध्यरात्री येते. तेही कमी दाबाने. त्यामुळे आम्हाला लाखो रुपये आम्हाला पाण्यावर खर्च करावा लागतो. आम्ही कर भरूनही आम्हाला हवा तसा पाणीपुरवठा होत नाही.
- सुप्रिया घुले
....
अस्ट्रॉनिया सोसायटी, उंड्री
- सदनिकांची संख्या : ३८४
- एकूण रहिवासी : २००० ते २५००
- दिवसाला लागणारे टॅंकर ः २५ टॅंकर
- एका टँकरचा खर्च ः १२०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः १ हजार रुपये

उन्हाळ्यात टँकरचे दर वाढतच आहेत. यामुळे कुटुंबाच्या आर्थिक खर्चात वाढ होत आहे. पाणी देत नसूनदेखील महापालिका मिळकतकरात पाणीपट्टी घेत आहे. महापालिकेकडून लूट सुरू आहे. मोफत पाणी टॅंकर देता येत नसेल तर महापालिकेने आम्हाला दरमहा १००० रुपये द्यावेत.
- कल्याणी पुणेकर
....
श्रीराम लोटस, वडगाव शिंदे रस्ता, लोहगाव
- सदनिकांची संख्या : २१९
- एकूण रहिवासी : ८०० ते ९००
- दिवसाला लागणारे टँकर : ७ ते ८
- एका टँकरचा खर्च : ८०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः सोसायटीच्या एकूण खर्चातून

टँकरचे पाणी हे मिश्रित स्वरूपाचे असते. कधी कधी त्या पाण्याला वासही येतो. तसेच एखादा टँकर खराब आल्यास संपूर्ण टाकीतील पाणी खराब होते. टाक्या वारंवार धुवाव्या लागतात.
- योगिता निंबाळकर
....

श्री निधी सोसायटी, पोरवाल रस्ता लोहगाव
- सदनिकांची संख्या : ३००
- एकूण रहिवासी : ७०० ते ७५०
- दिवसाला लागणारे टँकर : १० ते १२
- एका टँकरचा खर्च : ८०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः सोसायटीच्या एकूण खर्चातून

महापालिकेला मिळकतकर भरूनही पाण्यासारख्या मूलभूत गोष्टी आम्हाला विकत घ्याव्या लागतात. मागील अनेक वर्षांपासून हीच स्थिती असून, यात सुधारणे करणे अत्यंत गरजेचे आहे.
- प्रतिभा चव्हाण
....
मॅजेस्टिक अॅक्वा, फुरसुंगी
- सदनिकांची संख्या : ८८०
- एकूण रहिवासी : २५०० ते ३०००
- दिवसाला लागणारे टॅंकर : १५
- एका टँकरचा खर्च : २३०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः ६०० रुपये

महापालिकेचे मोफत टॅंकर सोसायटीला मिळत नाहीत. अनेकदा मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे खासगी टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. मासिक खर्चात ५०० ते ६०० रुपये वाढ होते.
- जयश्री पाटील
......
वर्धमान सोसायटी, आंबेगाव पठार
- सदनिकांची संख्या : २५०
- एकूण रहिवासी : १२००
- दिवसाला लागणारे टँकर : १०
- एका टँकरचा खर्च : ८०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः ४ हजार रुपये

या भागात कायम पाणीटंचाई असून, कमी दाबाने पुरवठा होतो. उन्हाळ्यात तर टंचाई अधिक तीव्र जाणवते. त्यात मागच्या आठवड्यात गुरुवारी पाणी बंद होते. त्यानंतर तीन दिवस सोसायटीत पाण्यासाठी वणवण करावे लागते. त्यामुळे येथील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, अशी मागणी आहे.
- प्रताप मुर्तडक
......
विघ्नहर्ता सोसायटी, आंबेगाव पठार
- सदनिकांची संख्या : ३५०
- एकूण रहिवासी : १८००
- दिवसाला लागणारे टँकर : १० ते १५
- एका टँकरचा खर्च : ८०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः ३ हजार ५०० रुपये

ग्रामपंचायतीपासून पाण्याची टंचाई सुरू आहे. त्यानंतर येथील भाग महापालिकेत समाविष्ट होऊनही प्रश्न सुटलेला नाही. सध्या उन्हाळा असल्यामुळे पाणीटंचाई अधिक जाणवत असून, पाणीपुरवठा कमी होतो. त्यामुळे नाईलाजास्तव पाण्याचे टॅंकर मागवावे लागतात.
- एक महिला सभासद
....
सुखदा वरदा संकुल, सुखसागरनगर
- सदनिकांची संख्या ः ६४
- एकूण रहिवासी ः २८० अंदाजे
- दिवसाला लागणारे टँकर ः २ ते ३
- एका टँकरचा खर्च ः १ हजार रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः विचाराधीन

मार्च २०२४ पासून आमच्या सोसायटीमध्ये पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. याचे मुख्य कारण म्हणजे महापालिकेकडून कमी दाबाने होणारा अनियमित पाणी पुरवठा होय. तसेच आठवड्यातून किमान एकदा तरी अघोषितरित्या पाणी बंद ठेवले जाते. ज्याचा परिणाम पुढील दोन दिवसांच्या पाणी पुरवठ्यावर होतो.
- स्नेहा दुगल, गृहिणी
...
लेक विस्टा, शनिनगर चौक, आंबेगाव खुर्द
- सदनिकांची संख्या : ६७६
- एकूण रहिवासी : २५००
- दिवसाला लागणारे टँकर : ४०
- एका टँकरचा खर्च किती : ७०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः २ हजार रुपये

पंपिंग स्टेशनमध्ये देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद असल्यास आमच्या सोसायटीत दोन दिवस पाणी येतच नाही. त्यामुळे देखभाल दुरुस्तीचे काम असल्यास पर्यायी व्यवस्था करून पाणी सोडण्यात यावे.
- कोमल यादव
....
समृद्धी लेक शोअर, जांभूळवाडी रस्ता, आंबेगाव खुर्द
- सदनिकांची संख्या : १५३
- एकूण रहिवासी : १४००
- दिवसाला लागणारे टँकर : १०
- एका टँकरचा खर्च : ६०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः १ हजार ५०० रुपये

महापालिकेने पाण्याची सोय करायला हवी. पाण्यामुळे आमची वाताहत होत असून, आर्थिक गणितही कोलमडले आहे. सद्यःस्थित टँकरमधून येणारे पाणी अशुद्ध असून त्याचा वास येतो. महापालिकेकडे बऱ्याच वेळा पाण्यासाठी पाठपुरावा केला. परंतु त्यांनी आमची दखल घेतली नाही. आमच्या सोसायटीत अद्याप महापालिकेचा एकही टँकर आलेला नाही.
- शुभांगी मोरे
...
अमित ब्लूम फील्ड, आंबेगाव बुद्रुक
- सदनिकांची संख्या : ४००
- एकूण रहिवासी : २०००
- दिवसाला लागणारे टँकर : ८-९
- एका टँकरचा खर्च : १ हजार ५०० रुपये
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः ५ हजार रुपये

पाण्याचे दुर्भिक्ष्य पुण्यात आहेत. परंतु जिथे टँकरने पाणीपुरवठा होऊ शकतो तिथे नळाने पाणीपुरवठा का होत नाही. महापालिकेचा कर आणि टँकरच्या कचाट्यात स्थानिक अडकले आहेत.
- मनीषा अहिरे
....
मिथिला, विमाननगर
- सदनिकांची संख्या ः ७८०
- एकूण रहिवासी ः ३०००
- दिवसाला लागणारे टँकर ः १० ते १२
- एका टँकरचा खर्च ः ००
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः ५ हजार रुपये

उन्हाळ्यात टँकरची संख्या आणि टँकरवाल्यांची अरेरावी वाढते. पैसे मोजूनेही पुरेसे टँकर मिळत नाहीत. पुणे महापालिकेला आम्ही मोठ्या प्रमाणात कर भरतो. त्यामुळे आम्हाला पुरेसे पाणी मिळावे, ही आमची अपेक्षा आहे.
- रेश्मा वाईकर
.....
कोणार्क कॅम्पस, विमाननगर
- सदनिकांची संख्या ः ५४४
- एकूण रहिवासी ः २०००
- दिवसाला लागणारे टँकर ः ४ ते ५
- एका टँकरचा खर्च किती ः ६००
- टँकरमुळे वाढलेला दरमहा मेंटेनन्स ः नाही

आमची विमाननगर भागातील मोठी सोसायटी आहे. पुणे महापालिकेने पुरेसे पाणी पुरविल्यास टँकरचा खर्च वाचेल.
- प्रज्ञा आढाव

माहिती संकलन ः राजेंद्रकृष्ण कापसे, कृष्णकांत कोबल, जागृती कुलकर्णी, नीलेश कांकरिया, प्रयागा होगे, रूपाली अवचरे, कैलास गावडे, अभिजित कुचेकर, शीतल बर्गे, नीलेश चांदगुडे, संदेश येवले, समाधान काटे, रीना महामुनी, किशोर गरड, बाबा तारे, विठ्ठल तांबे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com