kite festival
kite festivalesakal

Kite Festival in Pune: पुणेकर लुटणार पतंगबाजीचा आनंद ! गीता जयंती निमित्त पतंग महोत्सव अन् आनंद मेळाव्याचे आयोजन

पतंगबाजीचा आनंद घ्यायचा असेल तर ती सुविधाही तेथे उपलब्ध आहे. तसेच सायंकाळी मोठे मोठे एलईडी पतंगही उडवले जाणार आहेत.

Kite Festival in Pune: समाजातील गरजू विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी 'शिक्षणाची भेट' या कार्यक्रमांतर्गत गीता जयंती उत्सव, पतंग महोत्सव आणि आनंद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. माहेश्वरी प्रोफेशनल फोरम, पुणे साउथ द्वारे रविवार (7 जानेवारी 2024) बिबवेवाडीतील नाजुत्री हॉल येथे हा कर्यक्रम होणार आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8.30 वाजता गीता बाल संस्कारातील 15 वर्षांखालील मुलांकडून गीता जयंती साजरी करून होईल. या उत्सवात मुले श्रीमद्भगवद्वीता श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे भजन, कीर्तन इत्यादी सादर करतील. त्यानंतर सकाळी 11.00 वाजल्यापासून आनंद मेळावा व पतंग महोत्सवाला सुरुवात होईल.

Geeta Jayanti in bibvewadi

या मेळाव्यात अनेक व्यावसायिक प्रदर्शन, मनोरंजन आणि पतंग महोत्सवासह अनेक खाद्यपदार्थाचा आनंद घेता येणार आहे. पतंगबाजीचा आनंद घ्यायचा असेल तर ती सुविधाही तेथे उपलब्ध आहे. तसेच सायंकाळी मोठे मोठे एलईडी पतंगही उडवले जाणार आहेत.

तसेच या उपक्रमातून जमा होणारी रक्कम समाजातील गरजू गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येईल. याअंतर्गत आतापर्यंत 100 हून अधिक मुलांना मदत मिळाली आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन व्यवस्थापकांकडून करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी, परिमलजी हेडा यांच्याशी 9021487500 किंवा भरतजी गट्टाणी यांच्याशी 7798844044 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com