‘कमवा व शिका’ योजनेच्या 
मानधनात १० रुपयांनी वाढ

‘कमवा व शिका’ योजनेच्या मानधनात १० रुपयांनी वाढ

पुणे, ता. ६ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील ‘कमवा व शिका’ योजनेतील मानधनात दहा रुपयांनी वाढ करून ५५ रुपये करण्यात आले. विद्यापीठातील विविध विभाग आणि संलग्न महाविद्यालयांमध्ये एक जानेवारीपासून वाढीव मानधन लागू करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळातर्फे याबाबतचे परिपत्रक जाहीर करण्यात आले. यापूर्वी हे मानधन ४५ रुपये होते.
विद्यापीठाच्या अधिसभा सदस्य आणि विद्यार्थी संघटनांनी संलग्न महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या ‘कमवा व शिका’ योजनेच्या मानधनात वाढ करावी, याबाबत विद्यापीठाकडे पत्रव्यवहार केला होता. तसेच विद्यापीठाच्या अधिसभेमध्येसुद्धा काही सदस्यांनी या संदर्भातील ठराव व प्रस्ताव सादर केले होते. त्यावर सुमारे तीन महिन्यांपूर्वी व्यवस्थापन परिषदेमध्ये निर्णय घेण्यात आला. मात्र अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी झाली नव्हती. त्यामुळे मानधनवाढीचा निर्णय केव्हा लागू होणार, याबाबत विद्यार्थ्यांकडून प्रश्‍न उपस्थित केले जात होते. अखेर १ जानेवारीपासून मानधनवाढीचा निर्णय लागू करण्यात येत असल्याचे परिपत्रक विद्यापीठातर्फे प्रसिद्ध करण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com