येत्या रविवारी पुण्यात युवा मराठी साहित्य संमेलन पहिल्या संमेलनाच्या अध्यक्षपदी नवनाथ गोरे यांची निवड
पुणे, ता. २२ : राज्यस्तरीय पहिले युवा मराठी साहित्य संमेलन येत्या रविवारी (ता.२८) पुण्यात होणार आहे. या पहिल्या युवा संमेलनाच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय युवा साहित्य अकादमी पुरस्काराचे मानकरी लेखक नवनाथ गोरे यांची निवड केली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
पुणे शहरातील आंबेगाव पठार परिसरात असलेल्या पुणे केंब्रिज शिक्षण संस्थेच्या प्रांगणात हे साहित्य संमेलन होणार आहे. रविवारी सकाळी दहा वाजता ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२ वाजता उद्घाटन होणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे भोसले यांचे तेरावे वंशज युवराज छत्रपती संभाजी महाराज भोसले, ज्येष्ठ नाट्यकलावंत वसंत अवसरीकर, आमदार भीमराव तापकीर, माजी महापौर दत्तात्रेय धनकवडी आदी उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटन समारंभानंतर दुपारी अडीच वाजता ‘आजची युवा पिढी आणि आव्हाने’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे हे असणार आहेत. या परिसंवादात प्रा. योगेश्री कोकरे, रविकांत वरपे, प्रकाश धिंडले, सोनल पवार आदी सहभागी होणार असल्याचे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. चंद्रकांत कुंजीर आणि निमंत्रक साहित्यिक दशरथ यादव यांनी सांगितले.
त्याचदिवशी दुपारी साडेतीन वाजता ‘मी सावित्री बोलतेय’ हा नाट्यप्रयोग अश्विनी दीक्षित सादर करणार आहेत. याशिवाय कविसंमेलनाची तीन सत्रे होणार आहेत. संमेलनाध्यक्ष गोरे यांच्या ‘फेसाटी’ कादंबरीचा
मुंबई आणि गोंडवाना या दोन्ही विद्यापीठांच्या मराठी अभ्यासक्रमात समावेश केला आहे. गोरे यांनी आतापर्यंत वारूळ, मुराळी, सत्य घटना, रौंदाळ आदी पुस्तकांचे लेखन केले आहे. त्यांच्या ‘फेसाटी’ कादंबरीला राष्ट्रीय युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.