प्रमाणपत्र मिळवून बना महारेरा नोंदणीकृत एजंट

प्रमाणपत्र मिळवून बना 
महारेरा नोंदणीकृत एजंट

पुणे, ता. १२ : महारेराने रियल इस्टेट एजंट्ससाठी प्रशिक्षण व प्रमाणपत्र कार्यक्रम बंधनकारक केला आहे. आता नवीन एजंट नोंदणी व नोंदणीचे नूतनीकरण बंद केले आहे. यापुढे एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र असेल तरच नवीन नोंदणी करता येईल अथवा मुदत संपलेल्या नोंदणीचे नूतनीकरण करता येईल. तसेच ज्या नोंदणीकृत एजंटकडे सक्षमता प्रमाणपत्र नसेल त्यांची रेरा नोंदणी निलंबित होऊ शकते, त्यांना प्रवर्तक व विकसकासोबत काम करण्यासाठी अडचणी होऊ शकतात आणि महारेराकडून दंड होण्याची शक्यता आहे. हे सर्व टाळायचे असेल व नोंदणीकृत रेरा एजंट व्हायचे असेल तर २० तासांचे प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवणे अत्यावश्यक झाले आहे. या प्रशिक्षणाची पुढील ऑनलाइन व ऑफलाइन बॅच १९ फेब्रुवारीपासून सुरु होत आहे.
संपर्क : ७६२०१०३१३६, ९५०३६५५२७७

प्रात्यक्षिकाद्वारे मिळवा
दूध प्रक्रिया उद्योगाचे मार्गदर्शन
पुणे, ता. १२ : दूध प्रक्रिया उद्योगातील संधी, दूध संकलन, दुधाची साठवण, पाश्‍चरायझेशन, होमोजिनाईजेशन, प्रिझर्व्हेशन, क्रिम सेपरेशन, दुधापासून खवा, पेढा, पनीर, लस्सी, दही इ.पदार्थांची कृती, प्रात्यक्षिक, प्रक्रियेसाठी यंत्रसामग्री, प्रकल्प आराखडा, प्रॉडक्‍ट मार्केटिंग, ब्रॅंडिंग, अन्न प्रशासन परवाना, शासकीय योजना, बिझनेस प्लॅन इ. विषयी मार्गदर्शन करणारे प्रमाणपत्र प्रशिक्षण गुरुवार (ता. १५) व शुक्रवारी (ता. १६) होणार आहे. यात खवा, पनीर, लस्सी, दही इ.पदार्थ शिकण्याची संधी आहे. तसेच यशस्वी दूध प्रक्रिया उद्योजक अनुभव सांगणार आहेत.
संपर्क : ९१४६०३८०३१

शंख साधना कार्यशाळा
शंख साधनेद्वारे श्‍वासोच्छवास लांब होतात व दम्यासारखे श्‍वसनाचे व थायरॉईड, रक्तदाब, मधुमेह संबंधित आजार बरे होतात असा अनेकांचा अनुभव आहे. नियमित योगसाधना करणाऱ्यांनी शंख साधना केल्यास अंतःकरण अधिक शुद्ध होण्यास मदत होते. या पार्श्वभूमीवर शनिवारी (ता. १७) शंख साधनेविषयी प्रात्यक्षिकासहित माहिती देणारी कार्यशाळा आयोजिली आहे. यामध्ये शंख व सनातन धर्म, शंखाचे प्रकार, शंखाची नैसर्गिक निर्मिती, शंख नाद, शरीर व योग यांची माहिती व शंख नादाचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण होणार आहे.
संपर्क : ८९५६३४४४७२

व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट
आजकाल चित्रपट, वेब सिरीज, कार्टून्स इत्यादी क्षेत्रात व्हॉइस ओव्हर आणि डबिंग आर्टिस्टना प्रचंड मागणी आहे. या क्षेत्राबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा शनिवार (ता. १७) व रविवारी (ता. १८) आयोजिली आहे. ‘मराठी मुर्गा’ फेम आरजे राहुल हे यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. योग्य प्रशिक्षणानंतर व्हॉइस-ओव्हर कलाकार हे कार्टून, अॅनिमेशन, व्हिडिओ गेम्स, जाहिराती, कथा-कथन, ऑडिओबुक, डबिंग, ई-लर्निंग, रेडिओ आणि प्रोमोजसाठी आवाज देऊ शकतात व उत्तम करिअर करू शकतात.
संपर्क : ९१४६०३८०३१
वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणांचे ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com