रूबी हॉल क्लिनिकमधील 
१५० परिचारिकांना प्रशिक्षण

रूबी हॉल क्लिनिकमधील १५० परिचारिकांना प्रशिक्षण

Published on

पुणे, ता. १३ : परिचारिकांना आधुनिक रुग्णसेवेच्या प्रशिक्षणासाठी रूबी हॉल क्लिनिकने ‘सोसायटी ऑफ न्यूरो क्रिटिकल केअर’(एसएनसीसी) बरोबर भागीदारी केली आहे. त्याअंतर्गत ‘कॉम्प्रिहेन्सिव्ह न्यूरो नर्सिंग क्रिटिकल केअर कोर्स’ची घोषणा करण्यात आली. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णाला वैद्यकीयदृष्ट्या सहजतेने हाताळायचे मार्गदर्शन यात मिळणार आहे. रूबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेझ ग्रँट म्हणाले की, “यातून रुग्णालयातील रुग्णसेवेचा दर्जा उंचावणार आहे.” क्लिनिकच्या नर्सिंग सर्व्हिसेसच्या प्रमुख डॉ. श्रीलेखा राजेश म्हणाल्या, “या उपक्रमातून १५० परिचारिकांचा फक्त रुग्णसेवेचा दृष्टिकोन मोठा करणार नाही, तर तरुणांना वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाला प्रोत्साहन मिळेल.”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.