साखर उताऱ्यात कोल्हापूर राज्यात अव्वल कोल्हापूरचा सर्वाधिक ११.२ टक्के ः पुणे विभागाने दुसरे स्थान पटकावले
पुणे, ता. २४ ः राज्यातील यंदाच्या ऊस गळीत हंगामातील साखर उताऱ्यात पुन्हा एकदा कोल्हापूर विभागाने बाजी मारली आहे. त्यामुळे साखर उताऱ्यात कोल्हापूर विभाग राज्यात अव्वल ठरला आहे. या विभागाचा साखर उतारा हा सध्या ११.२ टक्के इतका आहे. यामध्ये पुणे विभागाने राज्यात दुसरे स्थान पटकावले असून, पुणे विभागाचा सध्याचा साखर उतारा हा १०.१३ टक्के इतका आहे.
राज्याच्या साखर आयुक्तालयामार्फत दररोज ऊस गळीत हंगामाची स्थिती दर्शविणारा अहवाल प्रसिद्ध करण्यात येतो. या अहवालात सध्या सुरू असलेले एकूण साखर कारखाने, बंद असलेले कारखाने कारखाना सहकारी की खासगी, कारखान्यांची विभागनिहाय रोजची एकूण ऊस गाळप क्षमता, प्रत्यक्षात झालेले ऊस गाळप, या गाळपातून उत्पादित झालेली साखर, चालू गळीत हंगाम सुरू झाल्यापासून आतापर्यंत झालेले एकूण ऊस गाळप, या गाळपातून उत्पादित झालेली साखर, गेल्या वर्षीच्या गळीत हंगामात झालेले एकूण ऊस गाळप आणि एकूण साखर निर्मिती, याबाबतची तुलनात्मक आकडेवारी, साखर उताऱ्याची विभागनिहाय टक्केवारी दिली जाते.
यंदाच्या ऊस गळीत हंगामात आतापर्यंत एकूण २०७ सहकारी साखर कारखाने सुरू झाले असून, यापैकी १०३ सहकारी आणि १०४ खासगी कारखाने आहेत. या सर्व कारखान्यांची मिळून रोजची एकूण ऊस गाळप क्षमता ही ९४ लाख नऊ हजार १५० मेट्रिक टन इतकी आहे. या सर्व कारखान्यांनी मिळून आतापर्यंत एकूण ७९८ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे. राज्यात सर्वाधिक साखर उतारा हा कोल्हापूर विभागाचा तर, सर्वात कमी म्हणजे केवळ ४.९८ टक्के साखर उतारा नागपूर विभागाचा आहे.
विभागनिहाय साखर उतारा (टक्केवारीत)
- कोल्हापूर --- ११.२ टक्के
- पुणे --- १०.१३
- नांदेड --- ९.७९
- नगर --- ९.५४
- अमरावती --- ९.११
- सोलापूर --- ९.०४
- छत्रपती संभाजीनगर --- ८.५२
- नागपूर --- ४.९८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.