सुधा जोशी 
यांचा सन्मान

सुधा जोशी यांचा सन्मान

पुणे, ता. १० : ‘‘मानवी जीवनात गुरुपरंपेतील पहिले स्थान हे आईला असते. प्रत्यक्षात माता सर्वांची गुरू आहे. त्यामुळे विठ्ठलाला विठूमाऊली आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वर माऊली, असे आईचे नाम दिले आहे. यामध्ये आपली वेगळी भावना व्यक्त होत असते,’’ असे मत राष्ट्रीय कीर्तनकार हभप डॉ. चारुदत्तबुवा आफळे यांनी व्यक्त केले.

अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था (नाशिक) पुणे केंद्रातर्फे वयाची शतकपूर्ती केलेल्या सुधा गोविंद जोशी यांचा सिंहगड रस्ता माणिकबाग येथील त्यांच्या निवासस्थानी विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी केंद्राचे अनिल शिदोरे, विश्वनाथ भालेराव, मकरंद माणकीकर, नीता पारखी, अनघा जोशी, मधुरा कुलकर्णी, सुवर्णा रिसबूड आदी उपस्थित होते. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम घेण्यात आला.

आफळे म्हणाले, ‘‘तब्बल १०० वर्षांपूर्वी शिक्षण व विविध भाषांवर प्रभुत्व मिळविण्याचे काम सुधा जोशी यांनी केले आहे. कुटुंबातील सदस्यांना पायावर उभे करणे हे आईचे मोठे काम आहे.’’ विश्वनाथ भालेराव यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com