पुणे विमानतळाची धावपट्टी सध्या आठ हजार ३३३ फूट (२.५३ किलोमीटर) आहे. तिचा विस्तार करून जवळपास १० हजार फूट होणार आहे.
पुणे विमानतळाची धावपट्टी सध्या आठ हजार ३३३ फूट (२.५३ किलोमीटर) आहे. तिचा विस्तार करून जवळपास १० हजार फूट होणार आहे. Sakal

Pune Airport : पुणे विमानतळाची वाढणार ‘धाव’; खर्च १६० कोटी; १६६७ फुटांनी धावपट्टी वाढेल; थेट अमेरिका, युरोप गाठणे शक्य

पुणे विमानतळाची धावपट्टी सध्या आठ हजार ३३३ फूट (२.५३ किलोमीटर) आहे. तिचा विस्तार करून जवळपास १० हजार फूट होणार आहे.

Pune News : पुणे विमानतळाची धावपट्टी सध्या आठ हजार ३३३ फूट (२.५३ किलोमीटर) आहे. तिचा विस्तार करून जवळपास १० हजार फूट होणार आहे. एक हजार ६६७ फुटांनी धावपट्टीची लांबी वाढविण्यात येणार आहे. यासाठी सुमारे १६० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामुळे पुणेकरांना थेट अमेरिका, युरोप गाठता येईल. शिवाय हा प्रवास विनाखंडित होणार आहे. या कामासाठी हवाई दलासह खासगी मालकीच्या जागेचे संपादन करण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून धावपट्टी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यापूर्वी हवाई दल आणि पुणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठकही झाली आहे. मागील महिन्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवीन टर्मिनलची पाहणी केली.

त्या वेळी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांना भूसंपादनाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यासाठी सुमारे १६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकार ६० टक्के, पुणे महापालिका २० टक्के, पिंपरी-चिंचवड महापालिका व पीएमआरडीए प्रत्येकी १० टक्के खर्च करणार आहे.

धावपट्टीवाढीचे गणित
विश्रांतवाडीतून विकफिल्ड चौकामार्गे लोहगावकडे जाणारा रस्ता धावपट्टीच्या वाढीसाठी महापालिकेकडून हवाई दलाला देण्यात येणार आहे. नागरिकांना लोहगावला जाण्यासाठी विश्रांतवाडीतील ५०९ चौकाजवळील हवाई दलाच्या जागेतून गॅरिसन इंजिनिअर येथून खाणीजवळून रस्ता तयार केला जाणार आहे.

त्यामुळे लोहगाववरून विमाननगरकडे जाताना प्रवासाचे अंतर काही प्रमाणात वाढणार आहे. लोहगावकडून विश्रांतवाडी, येरवड्याकडे येणाऱ्या व यामार्गे लोहगावकडे जाणाऱ्या नागरिकांना पर्यायी रस्त्याची सोय होणार आहे.

 पुणे विमानतळाची धावपट्टी सध्या आठ हजार ३३३ फूट (२.५३ किलोमीटर) आहे. तिचा विस्तार करून जवळपास १० हजार फूट होणार आहे.
Pune Dargah Case : कसबा पेठेतील शेख सल्ला दर्गाप्रकरणी अफवा; ३४ जणांविरुद्ध गुन्हा

पुणे विमानतळ धावपट्टी
- सध्या धावपट्टीची लांबी : ८,३३३ फूट (२.५३ किलोमीटर)
- वाढ झाल्यानंतर धावपट्टीची लांबी : १०,००० फूट (३.४८ किलोमीटर)
- धावपट्टीची होणारी वाढ : १,६६७ फूट (०.५० किलोमीटर)

 पुणे विमानतळाची धावपट्टी सध्या आठ हजार ३३३ फूट (२.५३ किलोमीटर) आहे. तिचा विस्तार करून जवळपास १० हजार फूट होणार आहे.
Pune Metro : पुण्यातील मेट्रोचा विस्तार; वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली मार्गाला मंजुरी

धावपट्टीचा असा होईल फायदा
- सध्या पुणे विमानतळावर बोइंग ७३७, एअरबस ए ३१९, ए -३२० , ए -३२१, डॅश ८ व एम्बरेर इआरजे यासारख्या विमानांची वाहतूक होते.
- याची प्रवासी क्षमता १८० इतकी आहे. तसेच या विमानांद्वारे विनाखंडित दूरचा प्रवास करणे शक्य नाही.
- परिणामी पुणे विमानतळावरील आंतरराष्ट्रीय सेवा मर्यादित आहे.
- धावपट्टीचा विस्तार झाल्यानंतर मात्र एअरबस -३५०, बोइंग -७८७ (ड्रीम लायनर) यांसारख्या मोठ्या विमानांची वाहतूक होईल.
- या विमानांची प्रवासी क्षमता २२० ते ४०० इतकी आहे.
- या विमानांतून पुणेकरांना थेट अमेरिका, युरोप गाठता येईल. शिवाय हा प्रवास विनाखंडित होणार आहे.

धावपट्टीचा विस्तार करण्यासाठीच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. काही प्रमाणात खासगी जमिनींचेदेखील संपादन करावे लागणार आहे. धावपट्टीचे काम हवाई मंत्रालयाने करावे तसेच यासाठीच्या खर्चाचा भार उचलावा, यासाठी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना विनंती करणार आहे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com