ऊर्जा, पाणी, वृक्षांबाबत
ग्रीन एक्स्पोचे आयोजन

ऊर्जा, पाणी, वृक्षांबाबत ग्रीन एक्स्पोचे आयोजन

पुणे, ता. २५ : ‘रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१’ने गेल्या काही वर्षांत कचरा व्यवस्थापन, पाणीबचत, जमिनीतील पाण्याची पातळी वाढवणे, नाला खोलीकरण, बंधारे, जलकुंड, ग्रीन सोसायटी अशा स्वरूपाचे विविध प्रकल्प यशस्वीरीत्या राबविले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शनिवार (ता. २७) व रविवारी (ता. २८) जंगली महाराज रस्त्यावरील संभाजी उद्यानात ग्रीन एक्स्पोचे आयोजन केले आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक केशव ताम्हनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी प्रांतपाल मंजू फडके उपस्थित होत्या.
एक्स्पोचे उद्‍घाटन शनिवारी सकाळी १०.३० वाजता रो‘टरी इंटरनॅशनल २०२४-२५’च्या अध्यक्ष स्टेफनी उर्चिक यांच्या हस्ते होणार आहे. ऊर्जा बचत, पाणीबचत, कचरा व्यवस्थापन आणि वृक्ष संवर्धनावर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. दोन्ही दिवशी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत ग्रीन एक्स्पो नागरिकांसाठी खुला आहे. रविवारी सायंकाळी ५ वाजता निवडक गृहनिर्माण संस्था आणि लघुउद्योजकांना रोटरी ग्रीन अवॉर्ड दिला जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com